अस्तित्व पटकथा भाग २१
मराठी शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट, पटकथा, कथा कल्पना, संवाद, मराठी चित्रपट लेखन आणि शॉर्ट फिल्मसाठी संपूर्ण मार्गदर्शन – Nishikant Harugale
अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे चालू ......
रुममध्ये आल्यावर उमाने दुधाचा ग्लास जवळील टेबलवर ठेवला. व ती विस्कटलेले अंथरुण लावू लागली.
मल्हारी, “ माफ करा. मुले खट्याळ आहेत. दंगामस्ती करतात..”
उमा, “ मुले ही मुलेच, त्यांनी दंगामस्ती करायची नाही तर कुणी करायची.”
मल्हारी, “ तुमच काम वाढवलं मात्र.”
उमा, “ असू देत. करते मी नीट.”
उमाने अंथरुण नीट लावले. व ती मल्हारीस दूध देऊ लागली.मल्हारी दूध घेतो. त्यांची नजरानजर झाली. तो उमाचे सौंदर्य न्याहाळू लागला.
उमा, “ घेताय ना दूध.”
मल्हारी, “ हा … बर तुम्ही.”
उमा, “ नाही..”
मल्हारी, “ मग हे घ्या अर्ध, तुम्ही प्या.”
उमाने मान हलवली. व तिने थोडं दूध प्याली.
मल्हारी राहिलेला ग्लास घेऊ लागला.
उमा, “ थांबा दुसरं आणते. हे उष्ट झालंय माझ्याकडून.”
मल्हारी, “ आज उष्ट बिष्ट सगळं चालतंय.”
तो राहिलेलं दूध पितो. लाईट बंद होते.
……. ….. ……
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उमा घरातील सर्व कामे करू लागली. तिचे काम पाहून सासू सासरे खुश होतात. सासूबाई उमाला बोलावून
लक्ष्मीबाई, “ उमा ये उमा, इकडे ये.”
उमा समोर आली.
सासूबाई , “ थांब इथे, आलेच.”
लक्ष्मीबाई आत खोलीत जाऊन दागिन्यांचा डबा आणतात. त्यातील एक दागिने उमाला देतात.
उमा, “ कुणाला? मला. “
अलका, “ घे की वहिनी, मस्त आहे की नाही.”
उमा हसली. व आत मध्ये गेली. ते पाहून जेवण खोलीत असलेल्या तिच्या जावा दागिने देताना पाहून.
पार्वती, “ पाहिलंस कशी काल आली नाही तोपर्यंत सासूबाईंनी लगेच दागिने तिला दिले.”
सरस्वती, “चल आपण पण जाऊ. आपल्याला पण मिळेल की.”
पार्वती, “ चल चल बघू.”
त्या लगबगीने बाहेर जाऊन उगाच.
सरस्वती, “ सासूबाई हे घ्या गुळपाणी.”
लक्ष्मीबाई, “ मी काय बाहेरून पाहुणी आलेय का गुळपाणी द्यायला.”
लगेच पार्वती दूध घेऊन आली.
पार्वती, “ हे घ्या दूध.”
लक्ष्मी, “ आज एकीवर एकीचं प्रेम उतू चाललेय.”
पार्वती, “तसं नाही, तुम्ही घरचा सगळा व्यवहार बघताय. त्यामुळे थकताय. तुमची कोण काळजी घेणार. म्हणून म्हंटलं आपणच घ्यायला पाहिजे. नाही का?”
लक्ष्मीबाई, “ अस म्हणताय. मग ठेवा. अन् जावा कामाला.”
सरस्वती, “ कस आहे. सासूबाई, माझा पण गळा मोकळा असतो. मला पण एखादी टीक किंवा माळ शोभेल की.”
पार्वती, “अन् माझे हात पण बघा ना, कसे रिकामे वाटतात. फक्त पाठल्याच आहेत. त्यात बिलवर कसे शोभून दिसतील ना, नाहीतर इकडे तिकडे सर्व नावे ठेवतात.”
लक्ष्मीबाई, “काय म्हणतात.”
पार्वती, “अस.. म्हणतात. की सासू जरी लक्ष्मी असली. तरी सुना लंकेच्या पार्वतीसारख्या आहेत. बघा ना, असं बोलणं त्यांना शोभत का? मी पण त्यांना ठणकावून सांगितलं की माझी सासू मला दागिन्यांनी मडवून टाकेल म्हणून.”
लक्ष्मीबाई, “ हो का बरं.”
सदाशिवराव, “ देऊन टाक एखादा दागिना त्यांना.”
लक्ष्मीबाई, “ तुम्ही गप्प बसा, या दोघी घरात आल्या तेव्हा काय घेऊन आल्या होत्या. हे जे आहे की नाही. ते आम्हीच दिलेलं आहे. मल्हारीच्या बायकोला ठेवलेले दागिने आता तिचे तिला दिले. अन् हे जे काही शिल्लक आहेत ना. ते माझ्या अलकाचे आहेत.”
अलका, “ काय आई.”
लक्ष्मीबाई, “ हे घे, राहिलेले दागिने तुझे.”
पार्वती व सरस्वती दोघी नाराज होऊन उभ्या होत्या.
लक्ष्मीबाई, “ तुम्हा दोघींना दागिनेच हवेत ना. मग घ्या तुमच्या नवऱ्यांकडून. कुठल्या कामात लक्ष नाही. की शेतावर ध्यान. सगळं त्या मल्हारीन पहायचं. अन् या दोघी घरात नुसत्या काड्या लावायच्या कामाच्या. राबा आणि घाला दागिने म्हणावं.”
“ उभ्या काय राहिलाय. जावा कामाला, जेवण आटपा जावा, शेतात भाकरी द्यायच्या हाईत. काय त्यासाठी पण बाई लावू.”
त्या आत गेल्या. अलका दागिन्यांचा डब्बा घेऊन आईच्या खोलीत गेली.
…… ……… ………
त्या गेल्यावर.
सदाशिवराव, “ द्यायची होतीस एखादा दागिना वाईट वाटलं असेल त्यांना.”
लक्ष्मीबाई, “काय वाटेल. वाटलं तर वाटू देत. अगोचरा सारख्या आहेत दोघी. माझ्या पोराचं लग्न मोडत होत्या. घोरपडी. अन् यांना मी देतोय दागिने. चला , घ्या ते दूध तुमच्या सुनांनी आणलेल. मला नको. नातवंडांची काळजी नसती तर या दोघींना चांगलाच इंगा दाखवला असता.”
लक्ष्मीबाई आत गेल्या.
….. …… …..
क्रमशः पुढे .....
अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
लग्न झाल्यावर उमा व मल्हारी सूर्यगावात आले. गावात आल्यावर देवाचे दर्शन घेतले गेले.
पुजारी त्यांकडून पूजेचं साहित्य घेऊन पूजा करतो. ती दोघे देवाच्या नंतर पुजारी काकांना नमस्कार करुन आशीर्वाद घेतात. गावातील अनेक लहान मुले तिथे जमलेली होती. ती हसत होती.
नंतर ती घरी आली. वाड्यावर आल्यावर बाहेर अंगणात खेळणारी मुले पाहून.
येसाजी, “ आर, ते बघा गाडीतून कोण उतरतय.”
तानाजी, “ काका न लगीन केलं वाटतं.”
कार्तिक, “ थोरली आई असल्यावर काहीपण घडू शकतं.”
आजी लक्ष्मीबाई, ( तानाजीस) “ बाळ , आत जा व आईला आरतीचं ताट घेऊन यायला सांग.”
तानाजीने आत निरोप दिला तेव्हा त्याची आई
आई, “ कशाला हवे ताट?”
तानाजी, “ तुमच्या जाऊबाई आल्यात त्यांना ओवाळण्यासाठी.”
त्या दोघी आश्चर्य चकीत होऊन.
“ काय?”
त्या दोघी बाहेर येऊन पाहून.
पार्वती, “ अगं बाई, खरंच की यांनी लग्न केलं.”
सरस्वती, “अगं बाई, माझी हौसच अपूर्ण राहिली, वाटतं होत. दिराच्या लग्नात तरी एखादी पैठणी मिळेल. पण म्हातारीनं गोंधळ घातला.”
पार्वती, “ नाहीतर काय? पाहुणे नाहीत, जेवण नाही, मांडव नाही. काही नाही. लावलं लगीन.”
त्यांना दारापाशी घुटमळतं असल्याचे पाहून.
लक्ष्मीबाई, “ सापडतीया की नाही पंचारती, काय शोधायला पोलिस पाठवू.”
पार्वती, “आले घेऊन.”
“ चल ग.”
त्या दोघी आत जाऊन पंचारती व माप घेऊन आल्या. व औक्षण करताना
पार्वतीने नाक मुरडले. ते पाहून.
नणंद अलका, “ काय वहिनी नाक कुठे, तोंड कुठे, जरा नीट होऊ दे.”
पार्वती, “हूं….”
त्यांनी औक्षण करुन नवरा नवरीला आत घेतले.
……. ….. ……..
रात्रीची वेळ मल्हारी आपल्या खोलीत होता. उमा जेवणखोलीत होती. तिच्या जावा तिच्याकडे पाहून तोंड वाकडे करतात. ती कावरी बावरी झाली. इतक्यात त्या ठिकाणी अलका, वासवी व अवंतिका आल्या.
अलका, “ काय वाहिनी अशी काय बावरलीस.”
उमा, “ काही नाही. “
अलका, “ थांब, मी मदत करते.”
ती दूध घेऊन गरम करुन ग्लास मध्ये ओतून तिच्याकडे देते.
अलका, “ हा… चल…”
वासवी, “ अगं, अत्ती हे दूध कशासाठी?”
अलका, “ गप ग, सिनेमा पाहिला नाहीस का? नवरी नव्या नवऱ्याला अशी दूध घेऊन जाते मग…”
अवंतिका, “ ती नवऱ्याला दूध पाजते.”
वासव, “ दूध पिल्यावर काय करते?”
अवंतिका, “ लाईट बंद होते.”
वासवी, “ लाईट बंद केल्यावर.”
अलका, ( अवंतिकाच्या तोंडावर हात ठेवून) “ ते झोपी जातात. चल म्हातारे लई प्रश्न विचारू नकोस.”
अलका उमेच्या हाती दुधाचा ग्लास देते. व त्या तिघींजनी उमाला मल्हारीच्या खोलीपर्यंत सोडतात.
वासवी, “काकीला काकांच्या खोलीची वाट माहित नाही का”
खोलीचे दार उघडताच त्या पाहतात. तिथे मुले खेळत होती. व त्यांनी सर्व फुलांच्या माळा विस्कटलेल्या होत्या. अलका काठी घेऊन त्यांना पळवून लावते. व उमाला आत जायला सांगते. उमा आत जाताना अवंतिका व वासवी पण निघाल्या होत्या. त्यांना तीने मागे ओढले.
अलका, “तुमच काय काम आहे?”
वासवी, “काकाला दूध देते की नाही ते बघते की.”
अलका, “लई शहाणी आहेस चल. मागे.”
उमा आत गेल्यावर अलका दार बंद करुन त्या दोघींना ओढून
“चल गुपचुप तिकडे.”
त्या आपल्या झोपण्याच्या खोलीकडे गेल्या.
…. …….. ……
अस्तित्व पटकथा भाग १८, अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे चालू ......
उमा बाहेर आल्यावर तिथून पुढे गावातील लोकांच्या प्रश्नाचा ससेमिरा मागे लागेल. म्हणून मुलांबरोबर रानात गेली. तिथे मुले बॉलने खेळत होती. तिथेच शेजारून रस्ता गेलेला होता. खेळताना छोट्या महिपतीने बॉल मारला. तो थेट रानातील विहिरीत गेला. तेव्हा.
महादू, “ खाल्लस शेण, तुला हजारदा सांगितलंय जरा बॉल दमान मारत जा. आता गेला ना विहिरीत. आता काय तुझा आज्जा येणार आहे का काढायला?”
महिपती, “लई बोलू नकोस मी काढतो.”
श्रीपती, “ तोंड बघा बॉल काढणार्याचं. पोहता येतं का?”
महिपती, “काढतो मी.”
तो धावत गेला. काठीने बॉल काढू लागला. त्याचा तोल जाऊन पाण्यात पडला.
मुले, “वाचवा, वाचवा, महिपती पडला.”
इतक्यात तिकडे रानात आलेली उमा जी झाडाखाली शांत बसली होती. ती आवाज ऐकून धावत गेली. विहिरीत उडी टाकली. त्याचवेळी मल्हारी व त्याचे आई वडील गाडीतून निघाले होते. मुलांचा आवाज ऐकून लक्ष्मीबाईनी गाडी थांबवण्यास सांगितली.
लक्ष्मीबाई, “ड्रायव्हर गाडी थांबवा. मल्हारी, धाव विहिरीकडे कोण पडलय बघ?”
मल्हारीने वेगाने दार उघडून धावत जाऊन विहिरीत उडी मारली. उमा महिपतीला शोधत होती. मल्हारीने बुडी मारुन महिपतीला पाण्याच्या बाहेर काढले. त्याचे पोट दाबून पाणी काढले. महिपती शुद्धीवर आला. त्यावेळी मल्हारीचे भिजलेल्या उमाकडे व उमाचे त्याच्याकडे लक्ष गेले. नजरा नजर झाली. उमा बाहेर विहिरीच्या पायरीवरून जाऊ लागली. मल्हारीने तिचा हात धरला. उमा हात सोडवून..
उमा, “आता काय काम आहे इथे. की दुसरं स्थळ पहायला निघालाय.”
मल्हारी, “ दुसर नाही, पहिलंच जुळवायला आलोय. “
उमा, “ घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करुन तोंडघशी पाडण्यापेक्षा आधीच नकार द्यायचा. उगाच कशाला घरी बोलवायचे.”
मल्हारी, “ अपमान कोणी केला. मी तर नाही.”
इतक्यात लक्ष्मीबाई व सदाशिवराव तिथे आले. मल्हारी व उमाचे बोलणे ऐकून लक्ष्मीबाई, “कोण ग तू, व विहिरीत का उडी घेतलीस.”
मल्हारी, “काय करेल बिचारी, घरी आलेल्या स्थळांन नकार दिल्यावर.”
उमाने तिरकस नजरेने पाहिले. ….
लक्ष्मीबाई, “ म्हणजे?”
मल्हारी, “ हीच ती, तुझ्या मुलाच्या कपाळावर विटीचा प्रसाद देणारी, तुझी होणारी….”
लक्ष्मीबाई, “उमा का?”
तिच्याकडे पाहून
“ अगं, भिजलीस की, थांब हा.”
“अहो, आणा ती पिशवी इकडे.”
सदाशिवरावांनी पिशवी दिली.
लक्ष्मीबाई, “ हा, घे, ही साडी अन् नेसून ये.”
उमा बाजूला झाडीत जाऊन साडी गुंडाळून आली.
लक्ष्मीबाई, “आता चल बस गाडीत अन् तुझ्या वाड्याची वाट दाखव.”
मल्हारी, “ हे आपलं बरं हाय, इथे मी भिजल्याचे काही नाही. व सुनेचं कौतुक चाललय.”
लक्ष्मीबाई, “ ये, गप्प, चल ग बस.”
उमा गाडीत बसली. गाडी निघाली. थोड्याच वेळात उमाच्या अंगणात पोहोचली. सर्वजण उतरले. गणपतराव झोपाळ्यावरून पाहतात. उमा व मल्हारीस ओल्या अंगाने पाहून.
गणपतराव, “ अगं, ऐकलस का? बाहेर ये जरा.”
आतून शकुंतला बाहेर आली. उमाला भिजलेली पाहून.
शकुंतला, “ हे, ग काय भिजलीस कशाने?”
लक्ष्मीबाई, “ काही नाही विहिरीत एक पोरगं पडलं होतं. त्याला वाचवताना दोघे भिजलीत. त्यांना कपडे द्या बदलायला.
शकुंतला, “चल आत.”
ती दोघे आत गेला. उमाने आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलले. शकुंतलाने आपल्या नवऱ्याचे धोतर व सदरा जे ठेवणीतले होते. ते मल्हारीस दिले. त्याने कपडे बदलले.
तोपर्यंत बाहेर गणपतराव व आजी, सदाशिवराव व लक्ष्मीबाईशी गप्पा करत बसले होते.
गणपतराव, “आपण…”
सदाशिवराव, “ आम्ही मल्हारीचे आई बाबा आहोत. व लग्नाची बोलणी करायला आलो आहोत.”
इतक्यात शकुंतला आतून चहा घेऊन आली. ते सर्व चहा घेत.
शकुंतला, “ पण आपल्या घरातील इतर मंडळींना …..”
लक्ष्मीबाई, “त्याचं सोडा हो, लग्न कुणाला करायचं आहे. मल्हारीला , त्याला मुलगी पसंत आहे व आता आम्ही पहिली, आमचा पण होकार आहे. तुमचं मत सांगा.”
शकुंतला, “ पण ते फोटो, चिठ्ठी.”
लक्ष्मीबाई, “ हे बघा, मला पूर्वीच कल्पना होती. माझी मैत्रीण आहे या गावात. शिवण्णा कुंभाराची बायको. तिच्याकडून सगळं माहीत आहे, अहो, आपल्या मुली झाडावर चढतात, शाळा शिकतात, घर सांभाळतात, काय बिघडलं त्यात. धडपडतातच ना. मला तर बाई मऊ मांजरीण नाही आवडतं. माझ्या मल्हारीला उमा शोभून दिसेल. तुमचं मत सांगा.”
शकुंतलाने नवऱ्याकडे पाहून डोळ्याने इशारा केला.
गणपतराव, “ आमचा होकार आहे. आता द्याय घ्यायचं बोला.”
लक्ष्मीबाई, “ हे बघा आमच्याकडे देवाने भरपूर दिले आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने काय घालाल ते घाला. नारळ मुलगी दिली तरी चालेल.”
आजी, “ मग बघता काय फोडा सुपारी.”
लक्ष्मीबाई, “ नुसती सुपारी नाही, लग्नच लावायचं बोला.”
उमाच लग्न ठरलं व तिचं व मल्हारीच लग्न लावलं गेलं.
……… ………. ……….
क्रमशः पुढे .......
अस्तित्व पटकथा, film story,marathi film story,marathi script,patkatha.,script,
क्रमशः पुढे चालू
इकडे कार्तिक शेतावर गेला. मल्हारी पाणी पाजत होता.
कार्तिक, ( ओरडत)
काका, काका.
मल्हारी पाणी पाजताना उभे राहून.
“काय रे काय काम आहे.”
कार्तिक, “तुला बघायल पाहुणे आलेत. चल घरला. काकीच्या घराकडील आहेत. कदाचित.”
मल्हारी, “ पुजारी काका बोलले नाहीत. बरं चल.”
मल्हारीने मोटर बंद केली. व आपल्या मोटारसायकली वरुन घरी निघाला. कार्तिकची सायकल बाजूला रानात ठेवली. व ते घरी निघाले.
….. ……. …….
दारात गाडी थांबली. बाहेर मुले बसली होती. अलका पण बाहेरून आली होती.
मल्हारी, “ चल लवकर.”
येसाजी, “ काही उपयोग नाही. आता.”
मल्हारी, “ का काय झालं?”
अलका, “ वाहिन्यांनी सर्व मोडलं.”
मल्हारी, “ काय, अस का केलं?”
अवंतिका, “ हा, हे घ्या.”
( फोटो व चिठ्ठी तिने दिली. मल्हारीने ते वाचले. इतक्यात तिथे गाडी आली. लक्ष्मीबाई व सदाशिवराव खाली उतरले. त्यांना पाहून….)
लक्ष्मीबाई, “आ, काय झाले. ही सगळी अशी का बसलेत?”
सदाशिवराव, “ झालं असेल काहीतरी, चल बघू.”
ते जवळ गेले.
लक्ष्मीबाई, “ काय झालं?”
वासवीने काकांच्या हातातील फोटो व पत्र दिले. लक्ष्मीबाई पाहू लागली.
अलका, “घरात दोन घरमोड्या असताना आणखी काय होणार. घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कडव्या शब्दांनी केल्यावर काय होईल? मला वाटतं माझं सुद्धा असंच होईल. मला वाटतं दादाला व मला आयुष्यभर असंच बिन लग्नाचं रहावं लागणार की काय? कुणास ठाऊक.”
लक्ष्मीबाई,( फोटो पाहून) “ वा… मुलगी झाडावर चढते. म्हणजे बाग उतरण्याचा खर्च वाचला.”
येसाजी, “ अगं आजी, चिठ्ठी तरी बघ.”
लक्ष्मीबाई, ( चष्मा ठीक करत) “ काय मेल्याची भाषा, धड मराठी पण लिहिता येत नाही. काय तर म्हणे, मुलगी झाडावर चढते. उद्या ढगांवर चढेल. अशी आंबे चोर तुम्हाला आवडेल का?”
“ मेल्य ला धड लिहिता पण येत नाही. व मिळाली चिठ्ठी अन् लग्न मोडल. काय रे कुणी मोडल. मल्हारी तू”
कार्तिक, “ नाही, काका शेतावर होता. त्याला माहिती पण नव्हतं.”
कार्तिक, “ आई व काकी या दोघींना हे सगळं माहीत होतं. आलेल्या पाहुण्यांना त्यांनीच सगळं दाखवलं.”
लक्ष्मीबाई, “ पाहुणे कुठे गेले?”
अलका, “ गेले त्यांच्या गावी, तुझ्या सुनांची बोलणी खाऊन.”
लक्ष्मीबाई, “मल्हारी जा आवरून ये.”
तो आत गेला.
सदाशिवराव, “ आता काय करायचं?”
लक्ष्मीबाई, “ काय म्हणजे लग्न.”
सदाशिवराव, “ तुला मान्य आहे हे.”
लक्ष्मीबाई, “ ही लक्ष्मी विचार करुनच पाय टाकते, मी त्या मुलीची सर्व माहिती काढलीय. मगच मल्हारीला पाठवून दिले होते.”
इतकयात मल्हारी आला. अलकाने हळद कुंकू व साहित्य आणून दिले. ते घेऊन मल्हारी ,लक्ष्मीबाई व सदाशिवराव गाडीत बसले व निघाले.
….. ……. ……
गाडी आसगावात अंगणात थांबली. गणपतराव व शंकुंतला गाडीतून खाली उतरली.
पाय धुताना
आजी, ( ज्योत्याच्या खांबणीला उभा राहून) “ काय ठरलं.”
शकुंतला, ( पाण्याची चुळ भरत) “तुमच्या नातीने जे गावभर गुण उधळलेत ना, ते सगळीकडे झालेत. आंबे काढते, चिंचा काढते, मुलांना बदडते. ते सगळ गावभर झालंय.”
आजी, “ अगं, पण ते शाळेत असतानाचे उपद्व्याप पण माझी नात खट्याळ असली तरी गुणी आहे हो.”
शकुंतला, “ तेच खट्याळ गुण पहायला येणाऱ्यांना खटकताहेत. व परवाच्या स्थळाचं डोकं पण याच बयेनेच फोडलंय. “
इतक्यात उमा बाहेरून तिथे आली. तिला पहात,
शकुंतला, “ पाहिलत का, जरा कुठे बाहेर गेलं की ही मांजरीन लागली घर फिरायला. कुठं गेली होतीस?”
उमा, “काही नाही, जरा उकडत होतं . म्हणून बागेत गेले होते.”
शकुंतला, “झालं का उंदरासारख उंडरुन. चल घरात.”
तिच्या हाताला धरुन ओढत आत नेते. आवाज ऐकून शेजारी पाजारी वाकून पहात असतात.
गणपतराव, “उगाच दंगा नको. शेजारी पाजारी बघताहेत. ”
शकुंतला, “ बघू देत. चल कारटे घरात. जन्मल्या आईला गिळून बसलीस. अन आता माझा जीव खातिया. नालायक, बाईच्या जातीनं कसं वेळूसारखं असावं. वेळ आली की नम्र रहावं. हिच मात्र निराळच.”
तीने पाठीत दोन धपाटे दिले.
आजी, “ उगाच गावच ऐकून बोलू नकोस. माझी उमा गुणाची हाय. माप एकापेक्षा एक स्थळ येतील चालून.”
शकुंतला, “आलेलं स्थळ सरसच होतं. पण हिच्या कारणाममूळे मोडल. आता बस म्हणावं एखादा नकटा बिकटा घेऊन”
आजी, “ माझ्या नातीच लग्न मोडणाऱ्याला देव पांगळं करु देत. मोडून ठेवू देत त्याला. बगळं उचलून टोचून खाऊ देत त्याला. मेल्यानं चांगल्या कामात खोडा घातला. येसीचा महादेव रगतपिती भरवील त्याला.”
त्यांचे बोलणे जगन ऐकत होता. तो आपले तोंड काळे करुन तिथून गेला.
उमा आतील खोलीत रडत होती.
आजी, “ ह.. सोड रडणं अन् जा बाहेर, मळभ जाईल मनावरलं, लग्नाचं काय? आजच उद्या होईल. त्यात काय विचार करायचा.”
उमा तिथून बाहेर गेली.
….. ……. ………. …..
क्रमशः पुढे
अस्तित्व पटकथा भाग १६, अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
गणपतरावांकडे श्यामभट्ट आले. व त्यांची पसंती विचारायला.
श्यामभट्ट, ( अंगणात येत.)” पाटील आहित का?”
गणपतराव, “कोण? भटजी बुवा. या की.”
श्यामभट्ट पायरी चढून वर आले. बाकड्यावर बसले.
गणपतराव, “ अहो, ऐकलंत का? चहा टाका, भटजी बुवा आलेत.”
शकुंतलाने चहा गड्याकडून पाठवला व ती ही आली.
चहा घेत.
भटजी, “ बरं, काय ठरलं. तुमचं मागल्या स्थळाबद्दल.”
गणपतराव, “ उमा, काय सांगायचं स्थळाला.”
उमा, “ तुम्हीच ठरवा, मी काय सांगणार.”
शकुंतला, “ सांगा होकार. पण…..”
गणपतराव, “ पण काय आणखीन.”
शकुंतला, “ मी म्हणते, नवऱ्याच घर एकदा पाहिलं असतं तर…..”
गणपतराव, “जाऊ की.” ( पुजाऱ्यांकडे पहात.) “ काय म्हणता?”
श्यामभट्ट, “ तर काय? जायलाच हवं. उमाला द्यायची म्हंटल्यावर, बरं मी तसं कळवतो.”
……. ………..
श्याम भट्टानी निरोप मधुकर पुजारी यांना दिला. की ते नवऱ्याचे घर पहायला येणार आहेत. म्हणून. दिवस ठरवून पुजारी बुवा वाड्यावर गेले. वाड्यावर सुनबाई पार्वतीकडे निरोप सांगितला. तिने घरातील बाहेर गेलेत. सांगेन असे सांगून तिने निरोप दिलाच नाही. शकुंतला, गणपतराव व श्याम भट्ट ठरल्यानुसार सूर्यगावला आले. त्यावेळी मल्हारी शेतावर तर लक्ष्मीबाई व सदाशिवराव शेजारील गावात देव दर्शनास गेले होते. अंगणात गाडी पोहोचली. वाळवण दारात घातलेलं होतं. बाहेर गोठ्यात जनावरांना शिवण्णा वैरण घालत होता.
शकुंतला, “ बाहेर कोणच दिसतं नाही. हेच घर ना, नाहीतर चुकीच्या घरात घुसायचो.”
श्याम भट्ट, “अहो, वाहिनी हेच ते घर. मधुकर पुजाऱ्यांच सांगण चुकायच नाही.”
गणपतराव, “अहो, पण पुजारी बुवा कुठे आहेत?”
श्याम भट्ट, “अहो, शेजारील गावी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. तिथे अडकलेत ते. येतीलच थोड्या वेळात”
इतक्यात शिवण्णा समोर येत.
शिवण्णा, “ कोण पाहिजे?”
श्याम भट्ट, “ मल्हारी सदाशिव पाटलांचं घर हेच ना.”
शिवण्णा, “हो, काय हवय.”
श्याम भट्ट, “ आसगावाहून पाहुणे आलेत. म्हणून सांगा . घर पहायला.”
शिवण्णा, “या की, पण मालक व मालकीण बाहेर गेलेत. व मल्हारराव शेतावर. “
कार्तिक व येसाजी तिथे जवळच खेळत होते. ते
कार्तिक, “शिवाकाका कोण आलंय?”
शिवण्णा, “ आपल्या धाकल्या धन्यासाठी आलेत ते. घर पहायला.”
कार्तिक, “काय, काकांना पहायला.”
शिवण्णा, “हो.”
कार्तिक, “येसाजी घरात सांग जा. मी काकांना बोलावून आणतो.”
कार्तिक सायकल घेऊन शेताकडे गेला. येसाजी घरात गेला. व त्याने आपल्या आईकडे निरोप दिला.
पार्वती, “अगं बाई, अहो जाऊबाई ऐकलत का, पाहुणे आलेत.”
सरस्वती, “हो, ऐकलं,” “ बर बाळ जा व तुज्या बाबांना व काकांना बोलावून अन् जा.”
शिवण्णा त्यांना आत घेऊन आला.येसाजीने बाबांना व काकांना बोलावले. व सरू नोकरांनीने पाहुण्यांना पाणी नेऊन दिले.
येसाजीचे बाबा फोन करत होते.
सरस्वती, “ कशाला फोन करताय. तुम्ही फक्त बाहेर बसा. आम्ही बघतो काय करायचं ते.”
जयसिंगराव, “ तुम्ही काय करणार आहात?”
सरस्वती, “ तुम्ही व प्रताप भाऊजी जाऊन बाहेर बसा. आम्ही आलोच फराळ घेऊन.”
जयसिंगराव व प्रताप बाहेर येऊन बसले. पाहुण्यांची चौकशी करू लागले. शिवण्णाने पाहुण्यांना पाणी दिले.
जयसिंगराव, “ घर शोधताना काही त्रास तर नाही ना झाला.”
श्याम भट्ट, “ नाही, मधुकर गुरुजींनी बरोबर पत्ता सांगितला होता.”
जयसिंगराव, “ बरं का हे आमचे बंधू प्रतापराव.”
गणपतराव, “ हा, हे काय करतात?”
इतक्यात पार्वती व सरस्वती काही फळे व सरबत घेऊन आल्या. ते ठेवत.
पार्वती, “ हे आमचे मिस्टर, कृषी क्षेत्रातील नामवंत संशोधक आहेत. सर्व शेती तेच पाहतात.”
सरस्वती, “ या वर्षी तर खूप धान्य पिकवलेय, ऊस, मक्का, तांदूळ, गहू, आमच्या बागा पण आहेत.”
गणपतराव, “ ते आहेच हो, पण तुमचे सासू सासरे कुठे दिसत नाहीत.”
पार्वती, “ते होय , अगं बाई , सांगायचंच राहीलं. ते होय शेजारील गावी देव दर्शनाला गेलेत. अन मल्हार भाऊजी शेतावर. तुम्ही येणार हे माहीत नव्हतं. नाहीतर थांबवलं असतं.”
प्रतापराव, “बोलवायला गेलाय मुलगा , येईलच इतक्यात. बर तुमची मुलगी."
गणपतराव, “आमची उमा होय, फार गुणी आहे. सर्व घरकाम करते. व …….”
सरस्वती , “ ते माहिताय आम्हाला, घ्या की सरबत. तुमच्या मुलीची ख्याती सर्व गावभर आहे.”
शकुंतला, “ म्हणजे, मी नाही समजलो.”
पार्वती, “ म्हणजे काय, हो, घ्या की, तिला छान झाडावरील कैर्या काढता येतात, पाणी ओढते आडाचे, आंबे व्हळीत पिकत घालते. प्रसंगी मुलाना चेचते पण. सगळ माहित आहे आम्हाला.”
सगळे आवाक होऊन पाहू लागले.
सरस्वती, “ अहो चेष्टा केली, घ्या की.”
शकुंतलाने गणपतरावांच्या चेहऱ्याकडे पहिले.
पार्वती, “ आम्ही फोटो पण पाहिलाय.”
सरस्वती, “ हा थांबा ह.. मी दाखवते.”
तेव्हा तिचे मुलांसोबत खेळत्याले व झाडावरील आंबे काढत्याले फोटो सरस्वतीने दाखवले.”
ते पाहून ती तिघे उठलीत. व नमस्कार करुन निघालीत.
पार्वती, “ अहो, अहो, अस काय? चहा तरी घ्या.”
जयसिंगराव, “ हे, अस बोलतात.”
ती गाडीमध्ये जाऊन बसलीत.
गणपतराव, “ ड्रायव्हर गाडी चालवा.”
ड्रायव्हर, “ जी.”
गाडी निघून जाताना.
येसाजी, ( धावत गाडी जवळ येत. व त्यांना उद्देशून)
“ अस, जाऊ नका, आमचे काका लई छान आहे. सुखात ठेवतील काकीला.”
शकुंतला हसली व
“ ठेवेल हा पण …..”
गाडी निघाली.
इकडे या दोघी एकमेकांना आपले अंगठे दाखवून वेल डन म्हणून हसू लागल्या.
……. …… …….
क्रमशः पुढे.....