अस्तित्व पटकथा भाग २१
अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
त्या दोघी आत गेल्या. उमा लगेच आत आली. त्या तिच्याकडे बघून तोंड फिरवून पार्वती स्वयंपाक कट्याजवळ तर सरस्वती भांडी घासायच्या मोहरीत बसली. व भांड्यांचा खटारा घासू लागली. भांडी घासत. भांड्यांचा खटारा पाहून.
सरस्वती, “आई ग….”
सरस्वती, “आई गं.”
पार्वती, “ काय झालं.”
सरस्वती, “ अचानक पाठीत सनक भरली हो जाऊबाई.”
पार्वती, “ उठा घासते मी.”
सरस्वतीस पार्वती उठवून उभा करू लागली. तेव्हा भांड्याच्या खटाऱ्याकडे पाहून नजरेने उमाकडे इशारा केला. उमा तेव्हा शांतपणे भाजी चिरू लागली होती.
पार्वती, “ उमा ग जरा मदत करु लागतेस.”
उमा व पार्वती सरस्वतीस तिच्या रूममध्ये नेऊन पोहोचवतात. परत आल्यावर.
पार्वती, “ उमा ती भाजी ठेव. अन् ती भांडी तेवढी घास.”
उमा, “ जी.”
उमा भांडी घासायला जाते. भांडी घासून झाल्यावर.
पार्वती, “ आई गं, माझं डोक खूप दुखतंय ग , मी भात केलाय. तेवढी भाजी, आमटी, भाकरी करतेस का?”
उमा, “जी करते.”
पार्वती उठून सरळ सरस्वतीच्या रूममध्ये जाते. उमा जेवण करु लागते. तेव्हा बाहेरून कार्तिक आत येऊन पाणी पिऊन जाताना उमा काकीला जेवण करताना पाहून बाहेर पडतो. त्याला सरस्वती काकूंच्या खोलीतून खुसर फुसर ऐकू येत असते. त्याची आई व सरस्वती काकू बोलताना तो ऐकतो.
सरस्वती, “कशी युक्ती केली. दागिने घेते काय? घास म्हणावं भांडी.”
पार्वती, “मी पण भांडी घासून झाल्यावर लावल्या भाकरी थापायला. काल आली नाही तोपर्यंत हिचा थाट. हिला चांगलीच वाकवायची.”
त्यांचे बोलणे ऐकून कार्तिक धावत बाहेर गेला. व आजीच्या कानात कुजबुजला. आजीने ऐकून.
लक्ष्मीबाई, “जा खेळायला. बघते मी.”
ती लगेच स्वयंपाक घरात आली. तिने तिथे उमाला काम करताना पाहिले.
तिने छानसे नियोजन केले होते. आपल्या जावा तिच्यावर कारस्थान करत आहेत. हे तिने जाणले होते. थोड्या वेळातच स्वयंपाक खोलीतील कामे पटपट आवरू लागली. उमाने एकीकडे भाजी, दुसरीकडे आमटी शिजायला टाकून ती चुलीशेजारी बसून भाकरी थापत होती. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तिच्या भाकरी पाहून लक्ष्मी खुश झाली. व तिने सरस्वतीच्या खोलीचा कानोसा घेतला. त्यांचे हसणे, खिदळणे चालले होते. तिने त्यांचे कारस्थान ओळखले. थोड्या वेळात उमाने जेवण बनवले. लक्ष्मीने सरस्वती व पार्वतीस सोडून सर्वांना जेवायला बोलावले. सर्वजण जेवून गेली. शेतावर गेलेल्या मल्हारी व इतर गडी लोकांची भाकरी बांधून दिली. ती तानाजी व कार्तिक ती द्यायला गेली. सर्वांची जेवणे झाल्यावर तिने उमाला दोन ताटे करायला लावली. उमा जावांना बोलवायला निघाली.
लक्ष्मी, “ कोठे निघालीस?”
उमा, “ जाऊ बाईंना बोलावते.”
लक्ष्मी, “काही बोलवायची गरज नाही. तू बस. व जेव.”
उमा, “ पण त्या.”
लक्ष्मीबाई, “ तू त्यांची काळजी करु नकोस, तू जेवून घे.”
त्या दोघी जेवून घेतात. तेवढ्यात त्या दोघी हळूच स्वयंपाक खोलीत आल्या. त्या जेवायला घेणार इतक्यात.
लक्ष्मीबाई, “ काय गं, काय चाललंय, कुठे होता सकाळपासून.”
सरस्वती, “ काही नाही. थोड सळकल होतं. म्हणून विश्रांती घेत होते.”
लक्ष्मीबाई, “ दोघींना एकदम सळकल की.”
सरस्वती, “ मला सळकल होतं. म्हणून जाऊबाई मलम लावत होत्या.”
लक्ष्मीबाई, “टिचभर मलम लावायला दोन तास.”
पार्वती, “माझं पण अंग दुखत होतं.”
लक्ष्मीबाई, “ वा वा वा… म्हणे अंग दुखत होतं. कामचुकार कुठल्या. ते काही नाही. तुमचं बोलणं ऐकलंय मी. नव्या नवरीला काम लावून तुम्ही दोघी उंडारत होता. मला काय कळत नाही. ते काय नाही. मी शिवण्णा व सरूला दुसरं काम लावलय. तुम्ही दोघींनी राहिलेली भांडी घासयाची. कपडे धुवायची. जनावरांचे शेण काढून गोवऱ्या लावायच्या. अन् भाराभर वैरण कुटायची. अन् मग जेवायचं.”
असे सांगून लक्ष्मीबाई आपल्या खोलीत गेली.
… … ….. …..
दिवस सरू लागले. उमा आता तेथे चांगलीच रुळली होती. ती एकदा बाहेरील हौदावर धुणे धूत होती. मुलांमध्ये कोणता खेळ खेळायचा याबद्दल वाद चाललेला होता.
उमा, “अरे, भांडू नका.”
कार्तिक, “ बघ ना काकी, हा कायम रडीचा डाव खेळतो. कधीपण खेळताना कायम याच्यावर डाव आला की देत नाही.”
येसाजी, “तू तर खूप बिलंदर आहेस, खेळताना तू नियम मोडतोस.”
तानाजी, “हो तर, आम्ही बॉल थेट मारला की आऊट. अन् तू मारला की सिक्सर. नाय, नको आम्हाला.”
उमा, “अरे, सोडा सोडा.”
ती त्यांचे भाषण सोडवते. तेव्हा ती रुसून जवळील ओट्यावर बसतात.
उमा, “अरे असे रुसता कसे? चला मी तुम्हाला नवीन डाव शिकवते. ती त्यांना लपा छपी खेळायला शिकवते.
….. …… …… ….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा