बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २९

 अस्तित्व पटकथा भाग २९


फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,

दुसऱ्या दिवशी वरूण तो जथ्था कुठपर्यंत गेला आहे. याची तपासणी करण्यासाठी साधूंना ऍडमिट केलेल्या दवाखान्यात जातो. तिथे जखमी साधू असतात. वरूण फळे घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो. तो त्या पेशंट साधू जवळ जाऊन बसतो.

 वरूण, “कशी आहे तब्येत आता.”

 एक साधू, “देव कृपेने आहे बरी, डिस्चार्ज मिळेल थोड्या दिवसात. पण वाईट एकच वाटतं की आम्हाला कुंभ करता येणार नाही.”

 वरूण , “तसं काही नाही तुम्हाला डिस्चार्ज मिळाला की खास गाडीने पाठवू. मुख्य दिवशी तरी पोहोचाल की.”

 दुसरा साधू, “खूप उपकार होतील.”

वरूण , “ आपला जथ्था, कुठपर्यंत पोहोचला असेल.”

 साधू , “असेल पंधरा-वीस किलोमीटर, नाशिकच्या दिशेने.” 

वरूण, “ बरं काळजी घ्या येतो.”

 साधू, “धन्यवाद.”

 वरूण निघतो.

….. …… …..

 दुसऱ्या दिवशी साधूंचा जथ्था एका नदीकाठी चालत आल्यावर, त्यातील एक महंत पुढे येतात. व आजचा मुक्काम इथे नदीकाठी करूया. उद्या पुढे प्रस्थान करू. सर्वजण नदीकाठी तळ ठोकतात. व भजन करू लागतात. काही भिक्षा मागून जवळील गावातून सिधा व आपल्याकडील शिल्लक शिधा एकत्र करून अन्न शिजवतात व खातात. भजन करू लागतात.

...................

 वरूण गाडीतून आपल्या चौघा मित्रांसोबत निघालेला होता वाटेत जागोजागी जथ्यांची चौकशी करत तो पुणे विभागात येतो. तेथे नदीकिनारी पुलावरून जाताना त्यास जथ्था दिसला.

 वरूणचा साथीदार पका, “ते बघ तिकडे पुलाखाली आहे.” वरूण गाडी साईडला घेतो. 

वरुण, “कुठे आहे.”

 भगवे झेंडे दिसतात. तो पुढे गाडी घेतो. थोड्या अंतरावर थांबून वरूण, “पका जाऊन जरा पाहुण बघा.”

पका जाऊन अंदाज घेतो. व परत येतो. गाडी शेजारी वरूण उभा आहे .

पका, “हो तोच जथ्था आहे.”

 वरूण, “चला बसा गाडीत.”

 थोडं पुढे गेल्यावर ती गाडी एका शेतवडीच्या रस्त्याला घालतात. तिथे गेल्यावर ते बिर्याणी काढून खातात. 

पवन, “ बिर्याणी का खायची.”

पंखा, “ मग काय त्या साधूंचा वरण भात खाणार.”

पोटभर खाल्ल्यावर पाणी पितात. व जोराचा आळस देतात.

 जीवा, “बिर्याणी मस्त होती.”

 वरूण, “झालं ना आता, चला लागा कामाला.”

 सम्या, “काय काम करायचं?”

 वरूण, “काय म्हणजे सोंग काढायचं?”

 सम्या, “कसल्ं?.”

 जीवा, “शिमग्याचं, चल आडगं कुठलं?”

 ते गाडीची डिक्की उघडून मागील बाजूने डिकीत असणाऱ्या वस्तू काढतात. वरूण पहिल्यांदा भगवी कपडे, नंतर कमंडलू, नंतर छडी, नंतर माळा, काढून देतो.

 सम्या, “हे कशाला?”

 वरूण, “चल दावतो कशाला ते?”

 ते सर्वजण शेजारील उसात शिरतात. थोड्या वेळाने कपडे बदलून येतात.

 जीवा, “हे साधू लोक कसे राहत असतील यात.”

 पंखा, “कसं म्हणजे? सगळे राहतात तसं.”

 सगळे चालताना….

 वरूण, “अरे, एक काम राहिलं.”

 सम्या, “काय राहिलं?”

 वरूण , “पवण्या पुढील गाडीतील डबी आण.”

 पवन पुढील बाजूस जातो व स्टेरिंग जवळील लॉकरमधून एक डब्बी आणतो. वरूण सगळ्यांना नाम ओढतो. 

वरूण, “चला आता. अन.. पका तू गाडी जवळ थांब.”

 ते अलख निरंजन करत त्या साधूंच्या जथ्थ्यात घुसले. तिथे साधूंच्या जवळ गेले. तेथे बसलेल्या साधूंपैकी एक जण 

एक साधू, “नमस्कार आपण कुठून आला.गुरुवर्य. आपला परिचय, आपले नाव.”

 वरुण, “ आम्हाला कडकनाथ महाराज म्हणतात. हे तीन आमचे शिष्य आहेत. भुंगी शिंगी व परनानंद.”

 साधू, “ आपले दर्शन झाले, परमानंद प्राप्त झाला. बरं का, आम्ही आता भोजन सेवन करणार आहोत. तुम्ही पण या आमच्या अल्पोपहारात सामील व्हा.”

 ककडनाथ, ( वरूण ) “अति आनंद झाला. चला…”

 ते भोजनास बसतात.

थोड्याच वेळात एक साधू जेवणासाठी केळीची पाने वाढतो. त्यावर थोडा भात व डाळ जी अळणी असते, ती वाढली जाते. 

साधू, “प्रभू, जेवण ग्रहण करा.”

 ते जेवू लागतात. पहिला घास घेतात. त्यांना ते बेचव लागते. 

जीवा, “हे साधू, काही खातच नाहीत का? कसलं हे जेवण अळणी केलंय.”

 साधूच्या वेशातील सम्या, “नाहीतर काय? मी तर असलं जेवण खाल्लं, तर दोन दिवसात रोडका होईन.”

  कडकनाथ ( वरूण), “गप्प बस, मगाशी खाल्लेस ना. गप नाटक कर. दोन चार घास खा. व गप्प बस.”

 जीवा, “यासाठी साधूच कशाला व्हायला पाहिजे? दोन थप्पडा लगावल्या असत्या यांना, तर सगळं सांगितलं असतं.”

 वरूण , “गप्प.”

 त्यांची कुजबूज ऐकूण एक साधू तिथे येतो.

साधू, “काही हवं का महाराज?”

 कडकनाथ, “नको, आम्ही फक्त एक घासच अन्न सेवन करतो. आमचं तेही झालेय. मी आपला ऋणी आहे.”

 साधू , “जेवण छान होतं ना?”

 कडकनाथ, “हो, खूपच छान, मस्त आम्ही आज पर्यंत असा आहारच केला नाही. अप्रतिम.”

 साधू, “धन्य वाटलं, बरं मी जातो, भांडी घासायला हवी.”

 तो गेल्यावर 

जीवा, “जेवण कसं झाले म्हणे, हे काय जेवण म्हणायचं? ना चव ना ढव.”

 कडकनाथ, “शांत रहा.”

 थोड्या वेळाने झोपायची तयारी चालू होते.

 एक साधू. आपली पथारी अंथरतो. व त्यावर झोपू लागतो.

 साधू, “आपली पथारी”

 कडकनाथ, “ ही धरतीच आमची पथारी व वरील निलांबर हेच आमचे पांघरूण आहे.”

 साधू, “बरं, झोपूया आता. पहाटे प्रस्थान करायचे आहे.” वरूण व त्याचे साथीदार देखील तेथे झोपतात. झोपल्यावर अंथरुणावर.

वरूण , (त्या साधूस) 

 कडकनाथ, “ आम्ही असे ऐकले की आपल्या जथ्यास अपघात झाला होता.”

 साधू, “हो झाला, एक श्रीमंताचा बिघडलेला मुलगा गाडी घेऊन घुसला होता. जथ्यात. चार - पाच जण जखमी झाले.”

 वरूण, “अरेरे! वाईट झालं. ते लोक कुठे आहेत?”

 साधू, “आहेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत.”

 वरूण , “त्यांच्या सेवेला कुणी नाही थांबलं.”

 साधू, “आहेत दोघेजण.”

 वरूण , “बरं… मी ऐकले की कुणा साधूने त्या मुलास दगड मारले.”

 साधू , “छे छे, कोणी मारले नाही, पण आमच्यातील रोहितानंद महाराजांनी एक दगड मारला होता. खरा.”

 वरूण, “कोण हे, रोहितानंद महाराज त्यांचे दर्शन घ्यावे म्हणतो.”

 साधू, “ते बघा, त्या तिथे आहे.”

 वरूण, “ते ध्यानस्थ बसलेले.”

 साधू, “ हो.”

वरूण , “ते काय करत आहेत .”

साधू, “रोज झोपण्यापूर्वी ते साधना करतात.”

 साधू झोपी जातो. थोड्याच वेळात तो घोरु लागल्यावर वरूण उठून रोहितानंद महाराजांजवळ गेला. तोपर्यंत ते ध्यानातून बाहेर आले होते.

 वरूण त्याजवळ गेला.”

 वरूण (कडकनाथ), “ नमस्कार स्वामी.”

 साधू, “ नमस्कार.”

वरूण, “मी असं ऐकले आहे, की आपणास सिद्धी प्राप्त झाली आहे.”

 साधू, “असं काही नाही.”

 वरूण , “नाही मी असे ऐकले. की आपण हवेतून दगड प्रकट करू शकता, काही दिवसापूर्वी या जथ्थ्यामध्ये घुसलेल्या एका विकृत मुलाला आपण त्याच्या गाडीवर एक मोठा हवेतून दगड प्रकट करून मारला.”

 साधू, “ तसे काही नाही. तो दगड माझ्याकडे होता. जेव्हा कोकण प्रांताहुन देश प्रांतावर आलो, तेव्हा वाटेत एका गावी मुक्काम केला होता. त्या ठिकाणी आम्हाला हा दगड मिळाला होता.”

 वरूण, “असं आहे होय, म्हणजे मी ऐकली ती अफवा होती म्हणा. मला वाटलं आपणास सिद्धी प्राप्त आहे.”

 साधू, “तसं काही नाही. मी चार वर्ष झाले संन्यास घेऊन व सिध्दीच म्हणाल, तर ती मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो.”

 वरूण , “माफ करा. मी तुमचा वेळ घेतला.”

 साधू, “त्यात काय शंका निरसन झाली. यात सगळं आलं.”

 वरूण , “बरं आपण निद्राधीन व्हा.”

 साधू, “ हो.”

 वरूण , “खूप वेळ झाला. आम्ही पण निद्रा घेतो.”

 वरूण तिथून निघतो. आपल्या जागी येतो. मध्यरात्री ते सर्व झोपल्यावर तिथून निघून आपल्या गाडी जवळ ते येतात व निघतात.”

…….. …..,. ……..

क्रमशः पुढे.......





शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २८

 अस्तित्व पटकथा भाग २८


फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,

दूर एके ठिकाणी रानात हिरव्यागार झाडीत असलेल्या फार्म हाऊसवर जयेश व त्याच्या मित्रांना घेऊन वरुण गेला. तेथे गेल्यावर ते चौघे गाडीतून बाहेर पडले. व फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेले. तिथे गेल्यावर आपले कपडे काढून जयेश फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला. व त्याने पाण्याचा शॉवर ऑन केला. थोड्या वेळात बॉस फार्म हाऊसवर आले. तिथे आल्यावर वरुणला. 

बॉस, “कोठे आहे जयेश?”

वरुण, “ आत मध्ये आहे.”

बॉस, “ सरळ आतील खोलीत जातात. तिथे जयेशचे मित्र असतात. त्यांच्याकडे करड्या नजरेने त्यांनी पाहिले. इतक्यात जयेश बाहेर कपडे बदलत आला. बॉस त्यासमोर जातात. हसत 

“कसा आहेस?”

जयेश,( हसत )“ आहे ठीक.”

बॉस ताडकन त्याच्या कानाखाली लावतात.

बॉस, “ कधी सुधारणार आहेस. आज काय केलंस माहित आहे का तुला. तू जीव घेतला असतास त्या साधूंचा, आज वेळ चांगली म्हणून बचावलो. हे सारं वैभव कुणासाठी, माझ्यासाठी नाहीये. हे फक्त तुला सांभाळायचं आहे. सुधार आता.”

त्याच्या मित्रांकडे पाहत.

बॉस, “ काय रे याला बिघडायला तुम्ही कारणीभूत आहात. तुमचा काय दोष आहे म्हणा. तुम्हाला तर आयती ऐश करायला मिळते ना. तुम्ही कसे त्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून अडवाल. इथून पुढे त्याच्या आसपास दिसला तर याद राखा. अन हो, हे प्रकरण शांत होई पर्यंत इथेच गुपचूप राहायचं. वरुण तुमची सोय करेल. हे प्रकरण शांत झाले की तुम्हाला सोडले जाईल.”

बॉस तेथून बाहेर पडतात. बाहेर पडताना 

बॉस, “ वरुण यांकडे लक्ष ठेव. कुठे जाता कामा नयेत.”

वरुण, “जी सर.”

बॉस तिथून निघतात.

……. …… …… ……

दोन दिवसांनी गोडावून जवळील संशोधन विभागात बॉस पाहणी करत असतात. तिथे वेगवेगळ्या धातूंवर संशोधन केले जात होते. तिथे ते मुख्य संशोधन विभागात येतात. 

बॉस, “ नमस्कार , प्रभाकरन सर.”

प्रभाकरन, “ नमस्कार.”

बॉस, “ काय सापडली का नवीन खाण.”

प्रभाकरन, “ नाही अजून, आपल्या परिसरात तरी नाही अजून.”

बॉस, “ काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर संपूर्ण इन्व्हेस्टमेंट हलवावी लागेल. शेअर खाली कोसळू लागलेत. लाखाचे नुकसान होतेय.”

प्रभाकरन, “ खाणी काय एक दोन वर्षात तयार होत नाहीत सर. त्याला खूप वर्षे लागतात सर. बाकीच्या खाणी सरकारी नियंत्रणात आहेत.”

बॉस, “त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. नाहीतर तेथून फायद्याची चिन्हे दिसत नाहीत. आधीच हिऱ्याचा व सोन्याचा उद्योग परदेशी हलवला आहे. व हा लोह पोलाद उद्योग देखील कच्च्या माला अभावी बंद पडला तर काही खर नाही.”

प्रभाकरन, “ पाहूया, काहीतरी करूया.”

इतक्यात तिथे एक शिपाई रिंग वाजवून,

शिपाई, “सर, आत येऊ का?”

बॉस, “हा.”

शिपाई, “सर बाहेर दोन काच बसविणारे आले आहेत.”

बॉस, “सांगा की त्यांना बसवायला. तिथे पण मी येऊ का?”

शिपाई, “ जी”

प्रभाकरन, “सर चिडू नका, पाहू काहीतरी.”

दोघे बाहेर त्या रुम मधून पडतात. चालू लागतात. जिना उतरुन खाली येताना.

बॉस, “प्रभाकरन, तुमच्यावर सगळी भिस्त आहे.”

प्रभाकरन, “ मी प्रयत्न करतो सर.”

 ते खाली येतात. थेट गाडीजवळ येतात. ते येईपर्यंत गाडीतील ती फुटकी काच. व तो दगड बाहेर काढून टाकलेला असतो. त्याजवळ आल्यावर.

बॉस, “हा बोला काय म्हणताय.”

कारागीर, “ काच बसविण्यासाठी आमच्या गोडाऊनला गाडी न्यावी लागेल.”

बॉस, “अरे, तिथे नेता आली असती तर तुम्हाला इकडे कशाला बोलावले असते.”

कारागीर, “मग ज्यादा चार्ज लागेल.”

बॉस, “ तुमच काय असेल ते काम पूर्ण करा. व बिल पाठवा. तुमची रक्कम तुम्हाला दिली जाईल.”

कारागीर, “हा.”

 इतक्यात प्रभाकरणचे लक्ष शेजारी पडलेल्या दगडाकडे जाते.

त्याने तो दगड उचलून घेतला.व बारकाईने निरीक्षण केले. ते निघतात. बॉस प्रभाकरन कडे पहात.

 बॉस, “काय प्रभाकरन, काय पाहताय.”

 प्रभाकर, “ काही नाही ही वस्तू म्हणजे दगड पाहतोय.” बॉस “ एवढासा दगड माझ्या गाडीची बुलेटप्रुफ काच फोडून आत घुसला.”

 प्रभाकरन, “ बुलेट काच फोडणारा हा दगडही त्याच गुणवत्तेचा असेल. पाहू संशोधन करून.”

 बॉस, “ तुम्ही पण प्रभाकरन कशाचही संशोधन करता साधा. रस्त्यावर पडलेला हा दगड होता तो.”

प्रभाकर, “ काय करणार संशोधकाचं डोकं कधी काही ना काही शोधतच असतं.”

बॉस, “ मग मी निघतो.”

 बॉस निघतात.

 प्रभाकरन तो दगड घेऊन आत येतो. दोन दिवसानंतर बॉस हिरालाल पांचाल आपल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. इतक्यात त्यांच्या समोरील टेबलावर ठेवलेल्या मोबाईलची रिंग होऊ लागते. मोबाईल पाहतात. त्यावर प्रभाकर हे नाव पडलेले असते.

 बॉस, “बोला प्रभाकर.”

प्रभाकर, “साहेब तुम्ही संशोधन विभागात याल का?”

 बॉस, “का? काही महत्त्वाच काम आहे.”

 प्रभाकरन, “ हो, अत्यंत महत्त्वाचा आहे.”

 बॉस, “ ऑफिस वर्क संपलं की लगेच येतो.”

 प्रभाकर, “ तरी किती वेळ लागेल?”

 बॉस, “चार वाजता निघेन एक महत्त्वाची मीटिंग आहे, ती संपवतो व मग येतो. प्रवासात आहे. ठीक आहे.”

 ते फोन ठेवतात.

................

 चार वाजले की संध्याकाळी चार वाजल्यानंतर बॉस आपल्या ऑफिसमधून बाहेर पडले व गाडीमध्ये बसले. गाडी निघाली. थोडं अंतर गेल्यावर.

 बॉस, “ ड्रायव्हर फार्म हाऊसवर घे.”

ड्रायव्हर, “जी…”

थोड्या वेळात गाडी फार्म हाऊसवर पोहोचते.

 बॉस गाडीतून उतरून आत मध्ये जातात वरूण तिथे बाहेर असतो बॉस सर्व ठीक आहे ना.”

 वरूण, “ ठीक आहे.”

 इतक्यात जयेश आतून येतो.

जयेश, “बाबा, काय झालं .”

बॉस, “अजून थोडे दिवस इथे थांब.”

जयेश, “ मला इथं कंटाळा आलाय. माझे मित्र पण कंटाळलेत.”

बॉस, “ आधी नको ते उद्योग करण्याआधी याचा विचार करायचा. तरी पण थोड्या वेळासाठी येऊ शकतोस.”

जयेश आपल्या मित्रांना , “चला रे…”

 बॉस, “ नाही, फक्त तूच माझ्या गाडीतून येऊ शकतोस.”

 जयेश, “ काय?”

बॉस, “ तुला ही जबाबदारी कळायला हवी, चल बस गाडीत.”

बॉस व जयेश गाडीत बसून निघतात. थोड्या वेळात ते कंपनीच्या संशोधन इमारतीच्या एरियात येतात. गाडी पार्किंग मध्ये लावली गेली. ते संशोधन विभागात गेले. तिथे संशोधक प्रभाकरन यांच्या संशोधन कक्षात त्यांनी प्रवेश केला.

 बॉस, “ नमस्कार प्रभाकरन एवढे तातडीने यायला सांगितलं.”

 प्रभाकरन , “या माझ्यामागे.”

 ते आतील खोलीकडे चालू लागतात. चालताना-

 प्रभाकरन , “ सर आपल्याला काल एक दगड गाडी जवळ सापडला होता ना?”

बॉस, “ हो मग त्याचे काय?”

 प्रभाकरण, “त्या छोट्याशा दगडाची किंमत लाखोच्या दरात आहे.”

 बॉस, “काय?”

 प्रभाकरण, “ होय सर, तो काही साधासुधा दगड नाही तर त्यामध्ये लोह व क्रोमाइट धातूचे भाग पाहायला मिळतात. आपल्या कंपनीला हवं असलेले लोहखनिज व रसायन उद्योगास आवश्यक क्रोमाईट आपणास हा दगड जिथे मिळाला तेथून मिळू शकते.”

 प्रभाकरन , “बर मला जयेश सांग. हा दगड कसा तुझ्या गाडीत आला?”

जयेश, “आम्ही पब मधून निघाल्यावर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी पुणे बंगळूर महामार्गावरून पुढे आड रस्त्याला लागलो. त्यावेळी चुकून एका वळणावरील निघालेल्या साधूंच्या जथ्थ्यात आमची गाडी घुसली. त्यावेळी जथ्थ्यातील एका साधने हा दगड मारला. व तेव्हा तो माझ्या गाडीत पडला.”

 प्रभाकरन, “पाहिलेत सर, बुलेटप्रूफ गाडीची काच फोडून जर हा खडा आतपर्यंत आला. याचा अर्थ तो किती टनक आहे. हे समजते. हा साठा जर मिळाला. जर आपल्या कंपनीला तेथे खाणकामाची परवानगी मिळाली तर आपण अरबपती होऊ शकतो.”

 बॉस, “परवानगी काय मिळवू, पण तो साठा कुठे आहे ते पाहायला पाहिजे?”

 प्रभाकरन, “हा जर त्यातील साधूने दगड मारलाय. म्हटल्यावर तो जथ्था कुठून आला? त्याची चौकशी करावी लागेल. व तीही गुप्तपणे, यासाठी कुणा तरी खास माणसावर ही जबाबदारी सोपवायला हवी.”

बॉस,( मनात )“अशी जबाबदारी कुणावर सोपवावी, कोण खास माणूस, हा वरूण.”

 बॉस, वरूण करेल सारे.”

 जयेश, “तुमची हरकत नसेल तर मी पण जाऊ का?”

 बॉस, “ आधी माहिती मिळू दे. व तुने केलेले हे प्रकरण शांत होऊ दे. मग तू शोध काय? तोपर्यंत फार्म हाऊस वर राहायचं काय?”

बॉस, बेल वाजवतो. शिपाई आत येतो.

 शिपाई, “बोला साहेब.”

 बॉस, “वरूणला बोलवा.”

 शिपाई जातो. वरूण येतो.

 वरूण, “ जी सर, आपण बोलवलंत.”

 बॉस, सर्व वरूणला समजवतात व खर्चासाठी काही रक्कम अकाउंट मधून घ्यायला सांगतात.

 वरूण, “ जी सर.”

 असे म्हणून स्माईल करून निघतो.

….. ……. ……..

क्रमशः पुढे......










शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २७

 अस्तित्व पटकथा भाग २७,


फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,

इकडे अपघात झालेल्या गाडीवर दगड मारा होताच. जयेश व त्याचे मित्र गाडी तेथे टाकून पळाले. थोडे अंतर गेल्यावर सुरक्षित आहोत हे जाणल्यावर जयेशने आपल्या घरी फोन केला.

जयेश, “हॅलो , हॅलो.”

बाबा, “ बोल कोण जयेश, कुठे आहेस. असा घाबरल्यासारखा आवाज का येतोय तुला.”

 जयेश, “बाबा, गाडीचा अपघात झाला आहे. मी शहराबाहेर रिंग रोडला आहे.”

जयेशने घडलेली घटना सांगितली.

बाबा, “ हे बघ, थांब तिथे, आलो लगेच.”

थोड्या वेळात जयेशचे बाबा येतात. साधूंची पाहणी करुन त्यांना हॉस्पिटल मध्ये नेऊन उपचार करतात. ड्रायव्हरला इशारा करुन ती गाडी कुणाला कळायच्या आधी घेऊन जायला सांगतात. आणखी एका कर्मचाऱ्यास जयेशला शोधून घेऊन जायला सांगतात. कर्मचारी ती गाडी घेऊन निघतो. इतर साधूंच्या भोजनाची व्यवस्था करतात. कर्मचारी अरुणला फोन करुन 

बॉस, “ हॅलो अरुण.”

अरुण, “हा बोला सर.”

बॉस, “ अरुण गाडी थेट आपल्या गोडाऊन शेजारील सर्वेक्षण विभागात जाऊ दे.”

अरुण, “ जी सर, पण काच बदलायला हवी.”

बॉस, “ ते तिथेच करु, आपल्या ओळखीचे स्लाईडिंगवाले बोलावून, उगाच शंका नको.”

अरुण, “ जी सर.”

अरुण गाडी घेऊन थेट सर्वेक्षण विभागात जातो. ज्या ठिकाणी कंपनीचा मोठा सर्वेक्षण विभाग असतो.”

त्या ठिकाणी गाडी आतील बाजूस पार्क केली जाते. अरुणने तेथील विभाग कर्मचाऱ्यास तिची किल्ली दिली. तो त्यास म्हणाला, “ गाडी नंबर सिक्स.”

अरुण पार्किंग एरियात त्या दुसऱ्या सहा नंबरवाल्या गाडीची चावी घेऊन आला. व ती गाडी घेऊन निघून गेला.

…….. ……… ………

बॉसने पाठवलेली दुसरी गाडी वरुण घेऊन थोडं पुढे गेला. त्याने कॉल केला. रिंग वाजू लागली. जयेशने फोन उचलला. “ हा बोला.”

वरुण, “ जयेश बाबा कुठे आहेत. मी वरुण बोलतोय.”

जयेश, “ पुढे थोड्या अंतरावर रानात आंब्याखाली.”

वरुण, “मी आता वळणावर पुलाजवळ आहे. तुम्ही कोठे आहात?”

जयेश, “तिथून खाली पुढे जवळचं.”

 वरुण, “ मी लोकेशन पाठवतो. तिथे या.”

वरुण लोकेशन पाठवतो. जयेश आपल्या मित्रांना घेऊन त्या दिशेने जातो. थोड्याच वेळात ते तिथे पोहोचले. वरुण गाडीचे दार उघडतो. ती गाडीत बसतात. दार लॉक होते. गाडी निघते. थोडे अंतर गेल्यावर वरुणला फोन येतो. वरुण गाडी चालवत फोन घेतो.

वरुण, “हॅलो सर, बोला.”

बॉस, “जयेश मिळाला का?”

 वरुण, “ हो.”

बॉस, “ त्यांना थेट फार्म हाऊसवर घेऊन जा.”

वरुण, “हा सर.”

ती चौघे भेदरलेल्या अवस्थेत होती. 

जयेश, “ काही घाबरण्यासारखं नाही ना. त्यातील एखादा साधू ..,”

वरुण, “ थोडे जखमी झालेत. बॉस पाहतील ते. तू निश्चित रहा.”

 जयेश, “ आपण कोठे चाललोय.”

वरुण, “ ते पोहोचल्यावर कळेलच.”

गाडी वेगाने फार्म हाऊस रोडला लागते.

…………… ……..

क्रमशः पुढे ........































































शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २६

अस्तित्व पटकथा भाग २६




अस्तित्व पटकथा , फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,

क्रमशः पुढे चालू 

 चार धाम यात्रेला गेलेली सदाशिवराव व लक्ष्मीबाई जगन्नाथपुरीला पोहोचली. त्यांनी जगन्नाथांचे दर्शन घेतले. व मुक्काम केलेल्या ठिकाणी आलीत. तिथे आल्यावर.

लक्ष्मीबाई, “ कशी असतील हो आपली मुलं, काय करत असतील. “

सदाशिवराव, “ असतील मजेत, आता काय ती लहान आहेत. थोडीच. कशाला उगाच काळजी करतेस.”

लक्ष्मीबाई, “तसं नाही हो. तुम्हाला त्या दोघींचे स्वभाव माहीत आहेत ना? उमाला पटवून घेणार नाहीत हो म्हणून.” 

सदाशिवराव, “ अलका आहे ना.”

लक्ष्मीबाई, “हो, पण ती आता किती दिवस, तिचंही लग्नाच बघायला हवं.”

सदाशिवराव, “ इथून गेल्यावर बघू, एखादं स्थळ, चला आता प्रसाद घेऊ व पुढील यात्रेस लागू.”

लक्ष्मीबाई, “हो चला, जय जगन्नाथ भगवान की.”

सदाशिवराव, “ जय,”

ती निघतात.

……. ……… …….

एका शहरात एका हॉटेल मध्ये एक पार्टी चालू आहे. तेथे तरुण व तरुणी जेवत आहेत. ती जयेश नावाच्या मुलास लांब नाईट पब मध्ये जाण्यासाठी कन्व्हेन्स करतात. तो आपली टू व्हीलर घेऊन निघतो. व आपल्या वडिलांच्या बिझनेस कंपनी ऑफिस मध्ये येतो. ऑफिस मध्ये हिरालाल पांचाल काम करत असतात. इतक्यात गाडी पार्क करुन जयेश आत आला.

जयेश, “ बाबा, चावी द्या.”

हिरालाल, “ नाही, मला हवी आहे. घरातील दुसरी घेऊन जा.”

जयेश, “ नको, मला हिच हवी आहे.”

तो इकडे तिकडे पाहतो. ऑफिस मधील टेबलावर त्याला किल्ली दिसते. तो ती चटकन घेतो. व निघतो. त्याचे वडील ओरडत असतात. पण त्यांकडे लक्ष न देता तो निघून पार्किंगमध्ये असलेली गाडी घेऊन जातो. हॉटेल बाहेर त्याचे मित्र उभे असतात. 

साहिल, “काय हे, किती उशीर यार.”

जयेश, “ काय करणार यार गाडी बाबा ऑफिसला घेऊन गेले होते. “

सुकन्या, “तुझ्या बाबांना सांगितलं नाहीस ना.”

जयेश, “ छे, नाही, चला बसा लवकर वेळ झालाय.”

त्याचे मित्र बसतात. तो वेगाने गाडी चालवतो. दूर शहरातील एका डिस्को पबमध्ये आवारात गाडी पोहोचली. गाडी थांबली. त्यातून ते आधीच झिंगलेल्या वेड्यावाकड्या अवस्थेत त्या पब मध्ये जातात.

 त्यातला एकजण, “ अरे यार, माझ्याकडे पैसे नाहीत.”

दुसरा, “चल यार, जयेश भरेल ना. तो असताना कशाला काळजी करतोस यार.”

 ती आतमध्ये गेली. जयेश एन्ट्री फी भरतो. व ती दारू पित सिगारेट ओढत धुंद होऊन नाचू लागलीत.”

थोड्याच वेळात जयेशचा फोन खणखणू लागला. त्याने फोन उचलला. व लगेच आपल्या मित्रांना इशारा केला. ते लागलीच पबच्या मागील बाजूने बाहेर पडले. जयेशने लगेच आपली गाडी पार्किंग मधून काढली. व वेगाने तो निघाला. त्याची गाडी बाहेर पडताच वेगाने निघाला. त्याची गाडी निघताच. एक पोलिस व्हॅन वेगाने तिथे दाखल झाली. दुसरी गाडी जयेशच्या गाडीच्या मागे लागली. त्या गाडीस चकवा देऊन तो खूप दूर गेला. नगराबाहेर गेला. सकाळ होऊ लागली. एक साधूंचा जथ्था वाटेने चालला होता. त्याने जथ्थ्यामध्ये गाडी घुसवणार इतक्यात ब्रेक मारला. तरी देखील काही साधूंना ठोकर बसल्याने जखमी झाले. त्यातील एका साधूने चिडून एक दगड फेकून मारला. व त्यांना सर्वांनी बेदम चोप दिला. गाडीचा हॉर्न एकसारखा वाजू लागला.

……. ……. …….. …… 

सूर्यगावातील एका घरात एक स्त्री आजारी आहे. ती खाटेवर झोपलेली होती. तिची मुलगी रानात आई आजारी असल्याने वांगी तोडण्यास गेली होती. तेव्हा गावातील एक गावगुंड राकेश तिथे आला. त्याने तिची छेड काढली. व तिच्यावर जबरदस्ती करू लागला. ती ओरडू लागली. त्याचवेळी मल्हारी आवाज ऐकून तिथे गेला. व त्यास खूप बदडले. व पिटाळून लावले. तो जाताना मल्हारीस तुला पाहून घेतो. सोडणार नाही. अशी धमकी देऊन गेला. 

…….. ……. ……..

क्रमशः पुढे ........

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २५

 अस्तित्व पटकथा भाग २५


अस्तित्व पटकथा , फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,


क्रमशः पुढे चालू.......

घरात आणलेली केळी मल्हारीने ठेवल्याचे अवंतिका व वासविला दिसले. उमा व मल्हारी रूममध्ये असताना वासावी व अवंतिका त्या घडातील दोन दोन केळी घेऊन परस बागेत गेल्या. विहिरीच्या ओट्या शेजारी बसून खात असताना येसाजीस समजले. 

येसाजी, “वाव, केळी , आम्हाला पण हवी.”

वसावे, “ जरा कुठे खाऊ लागलो की लगेच आले हावरट पणा करायला.”

कार्तिक, “तोंड आवर वासवी मोठ बारकं काही आहे की नाही.”

वसाव , “ आहे की, आम्ही काय तुझ्यासारखे नाही. दुसऱ्याच्या हातात दिसेल ते मागायला.”

कार्तिक, “ बरं सांग, ही केळी कुठून आणली ते?”

अवंतिका, “ घरात आहेत, काका काकूंच्या पलंगाखाली.”

तानाजी, “ काय?”

वासवी, “खरंच, मी तिथूनच आणलीत.”

येसाजी, “ चला रे, जाऊन बघूया आत.”

ती पळत घरात जातात. ती गेल्यावर.

वासवी, “ कशाला सांगितलस पलंगाखाली घड आहे ते, आता संपवतील ते.”

 अवंतिका,” हं.., याना सापडतात. केळी उशीर झाला लपवून ठेवलीत.”

 वासवी, “ते पण खरं आहे. पण तू काका व काकूंकडे का लावुन दिलेस.”

 अवंतिका, “अगं, काकांनी काही केळी त्यांच्या रूममध्ये नेली होती.”

 वासवी, “चल आपण देखिल जाऊन बघू आपल्याला आणखी एखादं मिळालं तर.”

त्या देखील गेल्या. मुले मल्हारीच्या खोलीत वाकून पाहतात. तो व उमा यांना केळी खाताना पाहून.

येसाजी, “काका , शोभत का हे.”

मल्हारी, “ काय झालं.”

येसाजी, “ अस लहान मुलांपासून चोरुन लपवून केळी खाता.”

मल्हारी, “ शोभतं की.”

तानाजी, “ तुम्ही आम्हाला विसरला की काय?”

मल्हारी, “हो.”

 कार्तिक, “ अस चोरुन केळी खाणे बरे नाही. आम्हाला पण केळी हवीत.”

 उमा, “ही घ्या.”

मल्हारी, “ नाही द्यायची. तू खा.”

 तानाजी, “ काकीचा गुलामच झालास की, तुझ्यासारख्या पहिलवानाला हे शोभत नाही.”

मल्हारी, “वा रे वा, सकाळी रगडून जेवला तुम्ही, व काकीला उपाशी ठेवला. तेव्हा कुठे होता?”

कार्तिक, “ काय काकी उपाशी आहे?”

मल्हारी, “ हो, म्हणूनच मी केळी आणलीत .“

जवळ जात.

तानाजी, “ काय ग, तू जेवली नाहीस.”

 उमा, “ जेवले की आताच, खाल्ली की केळी. घ्या ही.”

येसाजी, “खरंच घेऊ?”

उमा, “ हो.”

तरी पण ती दचकतात. व त्यातील दोन दोन केळी घेऊन बाहेर खेळायला जातात.

…………. ………. ……….

थोड्या वेळाने मल्हारी रूममधून बाहेर आला. त्याला पाहून पार्वती व सरस्वतीचे तोंड पडलेले होते. त्याचवेळी अवंतिका व वासवी तिथे येते. मुलांचा दंगा ऐकून अलका जागी झाली. व खालील खोलीत आली.

अवंतिका व वासविला कळले होते की त्यांच्या आया काय कारनामे करतात. त्याचवेळी पार्वती त्यांना म्हणाली, “वासवी, पाहिलंस का कशी केळी चोरुन खाल्ली जाताहेत ते.”

वासवी, “ माहिती आहेत. की मला.”

पार्वती, “ आता तरी कळलं का? आपलं कोण आणि परक कोण ते.”

वासवी, “ हो कळलं, की” 

पार्वती, “ काय कळलं .”

वासवी, “ कळलं की तू कशी जेवण लपवून ठेवतेस. काकीला कशी उपाशी ठेवतेस. एवढा पराक्रम तू करुन देखील तुझ्या मुलीला दोन केळी का असेना खायला दिलीत. तुझ्यात व त्यांच्यात खूप फरक आहे.”

सरस्वती, “गप्प ग, नालायक कुठली. मोठ्या माणसांना असं उलट बोलतात का?”

वासवी, “ कळत की? पण तुलाही कळयलं हवं काकीला उपाशी ठेवून आपण तुपाशी राहणं बरं नव्हे. “

पार्वती, “ देवळात नेलेला नेवैद्य खाल्ला ना तिने.”

अवंतिका, “कुणी सांगितलं तुला, की नैवेद्य तिने खाल्ला म्हणून, आम्ही तो रस्त्याकडेच्या भुकेलेल्या भिकाऱ्याला दिला.”

 अलका, “बरं तो खाल्ला असेल वा नसेल. तुला वाहिनी नको तो उद्योग करायला सांगितला कुणी.”

त्या गप्प बसल्या.

……… …… ……….

पावसाळा सुरु झालेला असतो. सगळीकडे हिरवळ पसरली होती. पावसाने त्रस्त झालेली भटकी कुत्री निवारा शोधत गावाबाहेरील जुन्या घाटमार्गातून जाणाऱ्या रस्त्याने निघाली होती. त्या वाटेत एक गुहा होती. त्या गुहेत प्राचीन काळापासून अनेक पांथस्थ विसावा घेत असत. पावसाळा व हिवाळा ऋतूत अनेक प्राणी निवाऱ्यासाठी तिथे थांबत. रात्रीच्या वेळी एका सशाची शिकार करुन काही कुत्री त्या गुहेत भांडत शिरलीत. त्यांच्या भांडणात गुहेतील काही दगड बाहेर गुहेच्या तोंडाशी येऊन पडले. थोड्या वेळाने त्यांचे भांडण त्या सशाच्या फडशा पाडल्याने संपले. तो ससा मटकावून थोड्या वेळाने ती कुत्री निघून गेली.

थोड्या दिवसांनी त्या वाटेवरून एक साधूंचा जथ्था नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी निघाला होता. कोकण विभागातून जंगलपट्टा पार करुन ते घाटभागातील सूर्यगावी आली होती. व त्या गुहेत थांबली. तिथे भजन , कीर्तन, भोजन करुन त्यांनी विश्रांती घेतली. व दुसऱ्या दिवशी ते निघाले. जाताना त्यातील एका साधूने त्या गुहेतील कुत्र्यांच्या पायाने आलेल्या दगडातील एक दगड मोह निर्माण झाल्याने उचलून आपल्या झोळीत टाकला. व तो जथ्था निघाला. त्यातून मार्गस्थ झाला.

……… ………….