शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २४

 अस्तित्व पटकथा भाग २४



अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू ........

उमाने वाटेने जाताना अलका व मुलींना सांगितले घरी गेल्यावर यातील काही सांगू नका .

मुलीनी सुद्धा मान हलवून होकार दिला. 

अलका, “ त्यांना काय एवढं सांगायचं. त्या काय मालकीण आहेत.”

वासवी, “ विचारलं तर खूप भूक लागली म्हणून आम्ही खाल्ला. असे सांगू त्यात काय?”

घरात आल्यावर वासवी नैवेद्याचे ताट घेऊन जेवण खोलीत गेली. ताट रिकामे पाहून 

पार्वती, “ काय ग, नैवेद्य कुठे हाय? तू खाल्लास.”

वासवी, “ नाही.”

पार्वती, “ मग अवंतिका किंवा अलकाने.”

वासवी, “ नाही.”

पार्वती, “ मग कुणी खाल्ला.”

वसव, “ देवाने खाल्ला, तुला कशाला हवे. वाढ आम्हाला जेवायला.”

पार्वती, “ काकी वाढेल की तुझी.”

वसव, “ ती गोठ्यात वैरण टाकायला गेलीय. तुम्ही दोघी खूप काम करता ना .”

पार्वती, “ खूप बोलतेस , त्या अलका व उमाच्या नादाने बिघडत चाललीस.”

वासवी, “ तिच्याच संगतीत राहिले तर सुधारू आम्ही. तुमच्या संगतीत राहिलो तर बिघडू.”

पार्वती, “लई बोलतेस, देऊ का एक.”

वासवी वेडावण दाखवते. तेव्हा पार्वती तिचे गाल पीचते. व कान पिळंगळते. इतक्यात बाहेरून अलका व अवंतिका आत येतात. वासवीचा कान पिळंगळताना पाहून .

अलका, “अगं, वाहिनी हे काय करतेस, कान दुखेल ना तिचा.”

पार्वती, “ दुखला तर दुखु देत, जीभ लई चरा चरा बोलतेय तिची. “

ती पुढे होते व कान सोडवते.

अलका, “वासावे मोठ्यानं उलट बोलू नये.”

वासवी, “ स्वारी आत्या.”

अलका, “चल जेवायला.”

 अवंतिका, “ पण काकी बाहेर थांबलेय.”

अलका, “ तिचं थोडं काम आहे. ती जेवेल नंतर. आपण चल जेऊन घेऊ.”

अलका, “वाहिनी वाढ जेवायला.”

पार्वती त्या तिघींना जेवायला वाढते. त्या जेवतात. व विसावा घेण्यासाठी वरील गच्चीवर जातात. त्या गेल्यावर पार्वतीने जेवण लपवून ठेवले. व भांडी घासायला ठेवली. 

बाहेरील काम आटोपून उमा आत आली. ती स्वयंपाक खोलीत गेली. तिने भांडी पाहिली. ती रिकामी होती. 

उमा, ( पार्वतीस) “ ताई, जेवण.”

पार्वती, “ संपल.”

 उमा, “ मी तर जेवलेच नाही. संपेल कसं.”

पार्वती, “ मला वाटलं, देवळात प्रसादाचे ताट जेवली असशील. म्हणून मी उरलेल गाईला दिलं.”

उमा काय समजायचे ते समजली. तिनं थोडं गुळ पाणी घेतलं. व बाहेर आली. पुन्हा चूल पेटवून काहीतरी बनवायचे म्हंटल्यास वेळ होणार. तेव्हा ती बाहेर बागेत आली. व झाडांना मोहर आलेला होता. ओळखीच्या झाडांची पाने तिने तोडली. ती पाण्याच्या हौदावर धुतली. व आंब्याच्या गारव्यास बसून तिने खाल्ली. तिला थोडे बरे वाटले. ती आपल्या खोलीत वामकुक्षी घेण्यासाठी गेली.

……. …. ……..

थोड्या वेळाने शेतातून मल्हारी घरी आला. तो आपले हातपाय धुवून आत निघाला. तेव्हा त्याच्या कानावर सरस्वती व पार्वतीचे बोलणे पडले. 

पार्वती, “ पाहिलंस कशी ठेवली उपाशी, लई शहाणपणा करत होती.”

सरस्वती, “ बरं झालं, खोड मोडलीस, घरच्यांनी खूप डोक्यावर बसवून ठेवलीय. कानामागून आली अन् तिखट झाली.”

पार्वती, “ तर काय? सासूबाई पण उमा अगं उमा अस करत मागे मागे फिरत होत्या. आता बस म्हणावं.”

सरस्वती, “अशी जर धाकात ठेवली तर बरं. नाहीतर….”

पार्वती, “ सासूबाई तीर्थयात्रेहून यायच्या आधी हिला कशी उंदीर करते बघ.”

सरस्वती, “ आपण म्याँव केलं की तिनं असं भिऊनच राहिलं पाहिजे. कस म्याँव”

 त्या हसू लागल्या.

त्याचे बोलणे ऐकून मल्हारीस उमा उपाशी आहे हे लक्षात येतं. तो मनात, ‘ म्हणजे आज उमा जेवली नाही तर, या दोघी राक्षसिणी असल्यावर आणखी काय होणार. आपण कायतरी केलं पाहिजे.’ 

 मल्हारी आल्या पाऊली माघारी फिरुन मागे जातो. दुपार झालेली होती. तो परस बागेत गेला. त्याने झाडांचे निरीक्षण केले. झाडांना मोहर आलेला होता. कुठेही फळ दिसत नव्हते. तेव्हा तो पुन्हा रानात गेला. व तिथे एक पिकत घातलेला केळीचा लोंगर त्याने खड्यातून काढला. व घरी घेऊन आला. सरळ तो आपल्या खोलीत आला. उमा पलंगावर झोपली होती. तो घड शेजारी ठेवून व एक केळ सोलून खात तो.

मल्हारी, “ किती मधुर केळी आहेत.”

उमा दचकून उठली. तिने पाहिले. तिला खूप भूक लागली होती. पण हावरटपणा करणे बरे नाही. म्हणून भावना आवरल्या. तसं तिला चिडवण्यासाठी.

मल्हारी, “खाणार काय?”

उमा, “ दिल्या तर खाईन.”

मल्हारी, “ हे घे.”

मल्हारीने हे घे म्हणताच तिने पटकन हातातून केळी काढून घेतली. व ती आधासासारखी बकाबक खाऊ लागली. तेव्हा मल्हारी.

मल्हारी, “अगं हळू खा. जेवली नाहीस ना.”

उमा, “तुम्हाला कस ठावं.”

मल्हारी, “ अंतरज्ञानी आहे मी.”

 उमा, “ ब्रह्मदेवच ना तुम्ही.”

मल्हारी, “ ब्रह्मदेव नाही, मल्हारी आहे. तो ही उमेचा.”

 उमा, “ गप्पा बस, काहीतरीच बोलता.”

 मल्हारी, “काहीतरीच काय, खरंच सांगतो.”

तो हसू लागतो.     

………. …….. ……….












शनिवार, १८ जुलै, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २३

 

अस्तित्व पटकथा भाग २३



अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


एके दिवशी एक साधू भ्रमंती करत सूर्यगावात आला. खूप चालल्याने तो थकला होता. गावाशेजारील डोंगरात एक गुहा होती. ते त्याला समजले होते. त्या रात्री त्याने तेथे विश्रांती घ्यायचे ठरवले होते. दिवस मावळायच्या आधीच तो अन्न भक्षण करीत असे. त्या दिवशी त्याने रात्र पाणी पिऊन सूर्यगाव जवळील गुहेत काढली. सकाळ झाली. त्यास खूप भूक लागलेली होती. तो चारिका करत गावात भिक्षा मागू लागला. परंतु त्यास कोणीही भिक्षा दिली नाही. कारण काही दिवसापूर्वी काही साधूच्या वेशात गावातून फिरुन काही चोर लोकांनी रेकी केली. व दुसऱ्या दिवशी गावातील काही घरात चोरी झाली. व ते पळून गेले होते. जिथे तिथे कट्यावर लोक बसून याच विषयावर चर्चा करत चांगल्याचा जमाना राहिला नाही. साधू संन्याशी असे वागू लागले तर कस व्हायचं. कुणावर विश्वास ठेवायचा. या विचाराने गावात त्यास कुणी भिक्षा दिली नाही.

ज्याच्या दारी जाई, जो तो हाकलून लावत असे. भुकेने तो व्याकुळ झाला होता. तसाच तो पाटील वाड्यावर गेला. मल्हारी शेतावर गुऱ्हाळ काम असल्याने गेला होता. मुले सुद्धा त्यासोबत गेली होती. शिवांना देखील जेवण द्यायला शेताकडे गेला होता. अलका, उमा व मुली सोमवार असल्याने शिवपूजा करण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या.

घरात पार्वती व सरस्वती या दोघीच होत्या. दुपारची वेळ होती. उन्हाच्या झळा मारत होत्या. साधू भिक्षा मागण्यासाठी वाड्यावर आला. त्याने हाक मारली.

साधू, “ भिक्षा दे माई.”

त्याने दोन तीन वेळा हाका मारल्या. उन्हाने त्यास खूप तहान लागली होती. जवळील पाण्याच्या हौदावर तो पाणी पिण्यासाठी वाकला. इतक्यात पार्वतीने पाहिले.

पार्वती, “ ऐ काय करतोस इथे, चोरटा आहेस वाटतं.”

तिचे बोलणे ऐकून तो दचकला व मागे वळून पाहिले.

साधू, “ नाही ताई मी काही चोरत नाही. तहान लागलीय म्हणून पाणी पितोय.”

पार्वती, “ मला माहितेय तुम्हा गोसाव्यांचे नखरे, मागे देखील असेच गोसावी येऊन गेले. अन् गावात चोऱ्या झाल्या. पाणी हवं तर मागायच. “

साधू, “ माफ करा. थोडं पाणी घेतो. थोडा सिधा द्या. “

त्याचवेळी सरस्वती बाहेर आली.

सरस्वती, “ काय झालं ताई,”

पार्वती, “ अगं, कोण गोसावडा आलाय भिक्षा मागत. मघाशी त्या पाण्याच्या हौदाजवळ काय करत होता.”

सरस्वती, “गोसावी की चोर कोण जाणे. द्या हाकलून.”

पार्वती, “ ये चालता हो इथून.”

 त्यांनी त्या गोसाव्याला हाकलले. त्याला केलेल्या धक्काधक्कीत त्याच्या हातातील कमंडलू सांडले. तो निराश होऊन वाटेला लागला. निर्जळी उपासाने शरीर अशक्त झाले होते. त्यात हे उपोषण घडले. व पाणी सुद्धा मिळाले नाही. त्याने कुठलेतरी नदी नाल्यातील पाणी प्यायचे व निघायचे ठरवले. पण थोडे अंतर गेल्यावर त्यास उन्हाने चक्कर मारू लागली. तो खाली पडला. त्या रागात त्याने या गावावर भयंकर अरिष्ट येईल असा शाप दिला.

याचवेळी उमा व मुली देवदर्शनाने परत येत होत्या.

उमा व तिच्यासोबत अलका, वासवी व अवंतिका देखील होती. मंदिरात जाऊन यायला आज खूप उशीर झाला होता. आज आद्य पूजा कोणीतरी केली होती. उमाने बिल्वपत्रे व श्वेत फुले वाहिली. व वांग्याचे भरीत दहीभात व तांदळाची भाकरी नेवेद्य आणला होता. तिने नेवैद्यातील एक घास काढून ठेवला. विभूती लावली. पूजा आटोपून त्या लगबगीने घरला निघाल्या. वाटेवर तो रस्त्याकडेला पडलेला साधू दिसला.

अवंतिका, “काकी ते बघ कोण पडलय.”

अलका, “ अंगावर भगवी वस्त्रे आहेत. कोणी साधू तर नसावा.”

उमा, “ चल बघू.”

त्या साधूजवळ आल्या उमाने ताट वासवीकडे दिले. त्याची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी त्याच्या हातापायांना धरुन बाजूला एका सावलीत नेले. पाणी पाणी म्हणत तळमळणाऱ्या साधूच्या मुखात त्यांनी पाण्याची धार धरली. पाणी पिल्याने त्यास बरे वाटले. उमास तो भुकेला आहे हे जाणवले. तिने वासवीकडील प्रसादाचे ताट घेऊन त्यास तो नेवैद्य दिला. त्याने तो नैवेद्य खूप दिवस भुकेला असल्यासारखा खाल्ला. त्यास अतिशय बरे वाटले. त्याने उमास हात जोडले. उमाने तसे न करण्यास सांगून त्याचे पाय धरुन नमस्कार केला. मुलींनी ही नमस्कार केला. कल्याण नमस्तू असा आशिर्वाद त्याने दिला. त्या तो बरा आहे हे पाहिल्यावर तिथून निघाल्या.

जाताना त्याने विचारले. “ साक्षात देवरूप आहात. तुम्ही कुठे राहता?”

अलका, “आम्ही होय याच गावात राहतो. गावाबाहेर मोठा वाडा आहे ना, तेथेच आम्ही राहतो.”

त्या पुढे वळण पार करुन गेल्या. त्या साधूला रडू आले. “ रागाच्या भरात आपण हे काय करुन बसलो. श्राप दिला. परमेश्वरा वाचव रे बाबा.”

पण काही उपयोग नव्हता. तो साधू थोडा शांत बसला. व थोड्या वेळाने मार्गस्थ झाला.

…….. …… ………..

क्रमशः पुढे.......





सोमवार, ६ जुलै, २०२६

अस्तित्व पटकथा भाग २२

 अस्तित्व पटकथा भाग २२



अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


क्रमशः पुढे चालू ......


सोमवारी उमा महादेवास जात असे. उमाने अलकास विचारले. व गावाबाहेरील दाट राईत असलेल्या देवदर्शनास अलका, अवंतिका, वासवी व उमा गेल्या. देवदर्शन झाल्यावर त्यां परत निघाल्या. वाटेत एक चोर एका स्त्रीचे मंगळसूत्र चोरुन निघाला होता. उमाने हेरुन आपले पूजेचे ताट अलकाकडे दिले. व वाटेने जाणाऱ्या आजोबांच्या कडील काठी घेतली. व फेकून मारली ती लागून तो पडला लोकांनी त्यास चोपले. त्याकडील मंगळसूत्र त्या स्त्रिस दिले.
ती स्त्री, “गुणी ग माझी बाय, माझं आहेव लेणं वाचवलस तू. परमेश्वर तुझे कल्याण करु देत.”
उमाने एक स्मितहास्य केले. व ती निघाली. अलका व मुली आश्चर्य चकित झाल्या. पुढे गेल्यावर.
अलका, “काय वहिनी किती गुपिते लपल्यात तुझ्यात.”
उमा, “ यात कसलं आलंय गुपित.”
 अवंतिका, “काकी आम्हाला पण शिकव ना.”
वासवी, “ मला पण.”
उमा, “शिकवेण की, चला आता घरी उशीर होईल.
…… …… …..

दुसऱ्या दिवशी वाड्यातील माळ्यावर वासवी काहीतरी शोधत होती. खाली उभा असणार अवंतिकास
“ हे घे, फेक खिडकीतून बाहेर.”
वासविने दिलेली काठी खिडकीतून बाहेर फेकली. अशा तीन काठ्या फेकल्या. त्या काठ्यांच्या आवाजाने येसाजी जो बागेतील पेरू काढत होता. त्याने ती काठी नारळी खाली येऊन पडलेली पाहिली. इतक्यात माळ्यावरून लपत छपत त्या दोघी खाली उतरल्या. व जिन्याने मागील दरवाजा जवळ उतरुन परसात पळाल्या. व त्या काठ्या त्या दोघींनी घेतल्या. व त्या दोघी निघाल्या. परसामागे थोडे अंतर गेल्यावर एक वावर होते. पावसाळ्याचे चार मास सोडले. तर रिकामेच असे. त्या ठिकाणी त्या गेल्या. तेथे अलका नी उमा वाट पाहत होत्या. या काठ्या घेऊन काय करणार ही जीज्ञासा जागृत होऊन येसाजी त्यामागे गेला. त्याने वावराशेजारील एका जाळीतून पाहिले. तेव्हा त्यास उमा काकी मुलींना लाठी काठी शिकवताना दिसली. ते बघून तो मागे पळत गेला. पलीकडील रानात खेळणात्या कार्तिक व तानाजीस त्याने सर्व सांगितले.
तानाजी, “ काय खरंच.”
येसाजी, “तर काय, कशी भिंगरीगत काठी फिरवत होती.”
 कार्तिक, “चल पाहुया.”
ते तिघे तिकडे निघून गेले. त्यांनी देखील पाहिले. त्या तिघींना काकी लाठी काठी शिकवत होती. तिचे काठी फिरवणे पाहून ती चकित झाली. व मागे त्यांना न दिसता आपल्या खेळण्याच्या जागेवर आली.
तानाजी, “ दादा काकी जेवढी शांत वाटते. तेवढी ती शांत नाहीये. “
कार्तिक, “जेवण पण खूप छान बनवते. मला फार आवडतो. स्वयंपाक तिच्या हातचा.”
येसाजी, “काका आमचा भाग्यवान आहे म्हणेनास.”
तानाजी, “असली काकी दिवा घेऊन शोधूनही सापडणार नाही.”
येसाजी, “पण ती ताईला व आत्तीला काठी चालवायला का शिकवत आहे.”
येसाजी, “तुझं डोक फोडायला.”
तानाजी, “बापरे, आता काय करायचं.”
कार्तिक, “ अरे वेड्या, काकी त्यांना स्वतःच्या रक्षणाचे धडे देत आहे.”
तानाजी, “ अस होय. मग काय भारीच हाय की. आपण पण जाऊयात की शिकायला.”
कार्तिक, “ आधी थोडं दिवस पाहूया. नंतर मग शिकूया. नाहीतर काकी लाजून शिकवायचं थांबवायची.”
 तानाजी, “ बरं.”
……… ……… …………
एके दिवशी रात्री लक्ष्मीबाईंना रात्री स्वप्न पडले. स्वप्नात जगन्नाथ पुरी, रामेश्वर, द्वारका, बद्रीनाथ दिसू लागले. . ती दचकून जागी झाली. तिने नवऱ्याला उठवले. व स्वप्नाबाबत सांगितले.
लक्ष्मीबाई “ या संसाराच्या व्यापात देवधर्म करायचे राहिलेत.”
सदाशिवराव, “ मग आता करूया.”
लक्ष्मीबाई, “ अस म्हणता, मग ठरवू जायचं.”
सदाशिवराव, “ पण जाण्यापूर्वी इथली व्यवस्था नीट लावायला हवी.”
लक्ष्मीबाई, “ हा, ते तर आहेच.”
सदाशिवराव, “ चल, झोप आता.”
ते झोपी गेले.
…….. …….. ……..
दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाईंनी घरातीलसर्व व्यवहार नीट लावून देतात. आपले आवरुन सर्वांना बोलावून.
लक्ष्मीबाई, “ हे पहा, आम्ही दोघेजण तीर्थयात्रेस जाणार आहोत. आम्ही नसताना मी सांगितले तसे सर्वांनी राहायचं. उद्यापासून घरातील स्वयंपाकाचे काम उमा पाहील. तसेच शेतीचा व्यवहार मल्हारी पाहील. पेढीवरील व्यवहार जयसिंग व प्रताप पाहील. व त्यावर मल्हारी देखरेख ठेवेल. जर दुकानात गैर मेळ दिसला तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात राहावं. सरला बाहेरील दळप कांडप, धुणीभांडी करेल. शिवण्णा जनावरांची वैरण व शेताकडे लक्ष देईल. व राहिल्या पार्वती व सरस्वती या शेण व धारा पाहतील. व शेतावर जाणाऱ्या माणसांच्या भाकऱ्या करतील.”
कमरेच्या किल्ल्यांचा जुडगा काढत
लक्ष्मीबाई, “अलका, हे घे किल्ल्या तुझ्या ताब्यात. नीट लक्ष ठेव. काय?”
अलका, “ हा आई.”
लक्ष्मीबाई, “ समजलं काय?”
 सर्वजण, “हो.”
ते आपले आवरून बाहेर पडतात. मल्हारी गाडी काढतो. व त्यांना सोडायला जातो.
…. ….. ……

मल्हारीने गाडी काढली. मागील डिक्कीत सर्व साहित्य ठेवले. मुले आजा आजीच्या मायेने जवळ आली.
लक्ष्मीबाई, “ हे बघा, भांडयाचं नाही. अन् काकीला मदत करत जावा. नाहीतर त्या तुमच्या आया तिला त्रास देतील. अन् काळजी घ्या. “
येसाजी, “ आजी , परत कधी येणार.”
आजी, “ येईन लवकरच. “
गाडी स्टार्ट होते. लक्ष्मीबाई व सदाशिवराव यांना सोडायला मल्हारी जातो.
….. ……. ….
सासू सासरे गेल्यावर पार्वती व सरस्वती एका खोलीत गेल्या.
पार्वती, “ गेली महाराणी. “
सरस्वती, “ पाहिलंस जेवणाच काम उमेला, अन् आम्ही काय शेण धारा काढायच्या.”
सरस्वती, “ही गेल्यावर वाटलं काहीतरी हातात सत्ता येईल.तर.”
पार्वती, “ सत्ता विसरा. वॉचमन आहे डोंबलावर आमच्या ही अलका कधी लगीन होऊन जातीय कुणास ठाऊक.”
 सरस्वती, “तर काय अन् ही पोरं आम्ही काढली असून देखिल त्या काकाच्या मागणं.”
इतक्यात तिथे कार्तिक येतो. त्याची बॅट घ्यायला.
कार्तिक, “मी ऐकलंय सगळं आजीला सांगेन आल्यावर.”
पार्वती, “मोठा शहाणा आलाय, आजीला सांगणार चोमडा.”
कार्तिक, “तुम्ही वागा ना नीट, मग मिळेल की सत्ता हातात. पण त्याला सुद्धा भाग्य लागतं.”
पार्वती, “ थांब तुला दाखवतेच इंगा. आजीचा चोमडा.”
 ती तांब्यावरील पेला फेकून मारते तो पेल्याचा मार चुकवतो व पळून जातो.
…… …….. ……. …….
 दुसऱ्या दिवशी सकाळी पाचचा गजर होतो. जयसिंगराव व सरस्वती झोपलेल असतात. गजर होताच.
जयसिंगराव, “अगं, उठ त्या धारेच बघ जा.”
सरस्वती, “ अजून वेळ आहे गप्प झोपा.”
जयसिंगराव, “अगं, शेण काढून धारा काढायला वेळ होतो. डेरी जाईल.”
सरस्वती, “पार्वती ताई उठतील.”
जयसिंगराव, “हे बघ, धारा निघाल्या नाहीत तर जड जाईल बघ.”
सरस्वती, “काय धारा धारा लावलय. झोपा गप.”
इकडे पार्वतीचा नवरा देखील तिला उठवत असतो. ती देखील सरस्वती धार काढेल झोपा म्हणते. व झोपी जाते.
कोणीही न उठल्याने धारेची वेळ झाल्यावर गाय हंबरू लागते. तिचे ओरडणे ऐकून उमा उठली. ती गोठ्यात गेली. शेण मागे सारुन धार काढायला बसली. त्याचवेळी अलका देखिल उठली. तिने उमाला धार काढायला गेल्याचे पाहिले. ती जवळ जाऊन म्हणाली.
“तू का धार काढतेस. त्या महाराणींना काढू देत की.”
उमा, “ अगं, आपलं घर, त्यात कशाला वाटणी घालायची. व ताईन जर वेळेत धार नाही काढली. तर मुक्या प्राण्यांचे हाल. त्यापेक्षा आपणच काढलेली बरी.”
ती धार काढून जेवण खोलीत गेली. अलका झाडू घेऊन लोटू लागली. वासवी व अवंतिका देखील मदत करु लागल्या. त्यांनी सर्व स्वच्छता करुन अंगणात रांगोळी घातली. तोपर्यंत उमाने अंघोळ आटोपली. व ती स्वयंपाक करायला लागली. तोपर्यंत साडेसात वाजले होते. पार्वती व सरस्वती अजून झोपल्या होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात होते. उमाने चहा बनवून सर्वांना पाठवून दिला. मुलांना दूध दिले. मल्हारी देखील उठला होता. त्यास तिने दूध दिले. व उमा जेवण करु लागली. थोड्या वेळाने पार्वती व सरस्वती उठल्या. व तोंड धुवायला न्हाणी घरात गेल्या. त्यांना पाहून
अलका, “ काय वहिनी धार काढलीस, दूध हवं होतं चहासाठी.”
त्या दोघी एकमेकींकडे पाहत होत्या. सरस्वती चरवी घेऊन…
सरस्वती, “ अगं बाई, विसरलेच की,”
ती धार काढायला गडबडीने जाताना पाहून.
 अलका, “ काढल्या धारा. आता शेण तेवढं काढा म्हणजे झालं. नाहीतर जेवणाचं विसरा.”
सरस्वती, “एवढं काही बोलायची गरज नाही ताईसाब. “
अलका, “आपलं काम जबाबदारीनं करावं माणसानं.”
त्या दोघी गडबडीत शेण काढायला गेल्या. पार्वती शेणावरून घसरून पडली.
पार्वती, “आई गं, पडले गं.”
सरस्वती, “ ताई लागलं तर नाही ना.”
पार्वती, “बोलत काय बसलीस, उचल की.”
ती तिला उचलून घेऊन आत जाते.
…. ……… ……


क्रमशः पुढे......