अस्तित्व पटकथा भाग ११ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
मल्हारी ( मनात) , “ खरंच, ती काळी असेल. असली तर. असूदे बघू.”
पाठीमागून धप्पा घालत मुले तिथे आली.
कार्तिक, “ काका , कसला विचार चाललाय?”
अवंतिका, “ कसला म्हणजे काकींचा, आणखी कोणाचा?”
येसाजी व तानाजी, “ काय खरंच.”
अवंतिका, “ मघाशी मी खांबा अडून ऐकलं, मघाशी मोठी आई, आजोबा अन् पुजारी काका बोलत होते.”
येसाजी, “ मग, ही तर आनंदाची बातमी आहे. त्यात काय झालं एवढं उदास व्हायला.”
अवंतिका, “ उदास होतील नाहीतर काय, मघाशी आई व लहान काकी बोलत होत्या. की कोळशाची खाण येणार आहे म्हणून.”
कार्तिक, “ म्हणजे, मी नाही समजलो.”
अवंतिका, “ अरे, वेडा रे वेडा, एवढं समजत नाही, काकी काळी आहे ना, म्हणून टोमणा मारत होत्या, काकांना.”
कार्तिक, “ काळी असली म्हणून काय झालं.”
येसाजी, “ गुण चांगले असले म्हणजे झालं.”
अवंतिका, “ पण मला माहितीये काकी कशी आहे ते.”
काका, “ काय, सांग कशी आहे ते.”
अवंतिका, “मग मला काय देशील.”
काका, “ तुला लॉलीपॉप देईन.”
अवंतिका, “ नको.”
काका, “ यात्रेत छानशी पर्स देईन.”
अवंतिका, “नको.”
काका, “मग, काय हवे? ”
अवंतिका, “ मला बुलेट वरून संपूर्ण गावाची सफर करुन आणायची”
मल्हारी, “चालेल, सांग.”
अवंतिका, “मी पाहिलं मोठी आई आजोबांना सांगताना डावा डोळा तिने बारीक करुन इशारा केला.”
मल्हारी, “ ही काय बातमी झाली, मला वाटलं तू फोटो पाहिला असशील.”
येसाजी, “ काका, एवढं कळत नाही का? काकी व आईला बेसावध ठेवण्यासाठी तुझी बायको काळी आहे म्हणून सांगितलं असणार.”
तानाजी, “हे मात्र अगदी बरोबर आहे. मागे एकदा स्थळ आलेलं होतं. तेव्हा स्थळाचा फोटो पाहिल्यावर आई घरात आदळ आपट करीत होती.”
कार्तिक, “ माझा विश्वास आहे. मोठी आई, चुकीचा निर्णय घेणार नाही.”
येसाजी, “ आता जाणारच आहेस ना, मुलगी पहायला. मग समजेलच की. दूधाच दूध व पाण्याचं पाणी होईल.
मल्हारी, “ अस असेल तर तुझ्या तोंडांत साखर पडो.”
कार्तिक, “ काय फक्त साखरंच. लाडू नाही.”
मल्हारी, “ अखंड डब्बा घे.”
मुले नाचू लागली.
…… ……. …
मुलगी पहायला जाताना मल्हारी आपला मेकअप करताना.
सरू, “ काय धाकलं मालक, आज लई आरशात बघताय.”
मल्हारी, ( हसत) : मग काय केस विंचरत असताना फरशीकडे बघू.”
सरू, “ तस नाही, रोजच्यापेक्षा जास्त पाहताय म्हणून म्हंटल. “
मल्हारी, “सरू इकडे ये.”
सरू पाण्याची घागर काखेत घेऊन जवळ येत.
सरू, “बोला, काय सेवा करू, नवरदेवाची.”
मल्हारी, “ नवरदेव म्हणू नको ग, उगाच चिडवतेस अजून कशात काय नाही.”
सरू, “ नाही कसं, मोठ्या बाई साहेबांनी स्थळ पाहिलंय म्हंटल्यावर पक्क झालं म्हणायचं.”
मल्हारी , “ बरं, ते राहू दे, मला सांग कसा दिसतोय मी?”
सरू, “ खरं सांगू, लई झ्याक दिसताय.”
आतून मोठी वाहिनी दुसऱ्या खोलीत जाताना
पार्वती, “ दिसून काय करायचं, येणारी तर काळतोंडीच आहे ना. तिला काय नवरा गोरा की काळा, कसलापण चालेल. मी काढलेलं स्थळ नको झालं. शेवटी आईच्या सांगण्याने डोलणाऱ्या नंदी बैलाच्या गळ्यात कोळसाच पडणार?”
सरू, ( हळू आवाजात) पुजारी काकांनी स्थळ काढलंय व मोठ्या बाईसाहेबांनी सांगितलय म्हणजे मुलगी चांगलीच असणार. तुम्ही जावा घोड्यावर बसून.”
मल्हारी, “ तसं जर झालं, तर मी पार्टी देईन सगळ्यांना.”
( तेवढ्यात तिथे मुले लपत छापत आली.)
येसाजी, “काय, झाली का तयारी.”
मल्हारी, “ कसा दिसतो मी?”
येसाजी, “ मस्त दिसतोस पण ती टोपी…”
मल्हारी, “ काय झालं, चांगली दिसत नाही का?”
( टोपी काढून केसांवर कंगवा फिरवत.)
कार्तिक, “ हा, आता मस्त दिसताय.”
अवंतिका, “ काका नवरी पहायला कशातून जाणार रथातून की घोड्यावरून.”
वासवी, “ अस काय म्हणतेस, बाहेर बघितली नाहीस का?”
तानाजी, “काय?”
वासवी, “ काळी घोडी उभा आहे ते.”
कार्तिक, “ कुठे आहे? मला दिसली नाही.”
येसाजी, “ अरे वेड्या, काळी घोडी म्हणजे बुलेट रे.”
कार्तिक हसू लागला.
वासवी, “ हसायला काय झालं.”
कार्तिक, “ बुलेट ठीक आहे. पण पुजारी काकांना नीट न्या म्हणजे झालं. नाहीतर हाड खिळखिळी करशीला.”
सर्व हसू लागले.
……….
पुजारी काका आले. अंगणात सरू वाळवण घालत होती. लक्ष्मीबाई व सदाशिवराव बोलत बसले होते. पुजारी काकांना पाहून.
लक्ष्मीबाई, “ या बसा बुवा.”
लक्ष्मीबाई, ( सरू) “ सरू ते काम ठेव. व मल्हारीस जाऊन सांग त्या आरशात पाहत बसू नकोस म्हणावं. जसा आहेस तसा पसंत होशील आटप म्हणावं. अन् त्या महाराणींनी चहा केला असेलं तर घेऊन ये. त्यांना काय, बाहेर कोण आलंय, गेलंय याचं काही नाही. बसल्या असतील खादडत. कधी सुधारतील देव जाणे.
सरला आत गेली. मल्हारीस
सरला, “ ओ साहेब, आवरा लवकर मुराळी आलाय बाहेर. “
मल्हारी आपले आवरून बाहेर आला. बाहेरील लक्ष्मीबाईंचा आवाज ऐकून दचकलेल्या सुना एकमेकीला.
पार्वती, “म्हातारीला आतलं कसं कळतं देव जाणे. “
सरला, “ कसं म्हणजे त्रिकालज्ञानी आहेत त्या. अन् हो तुमच्या गवती चहाचा वास सगळीकडे पसरला आहे.”
सरस्वती, “ घे, बाई घेऊन जा.”
सरला चहाचा ट्रे घेऊन आली.
सरला, “ मालकीण घ्या चहा.”
लक्ष्मीबाई, “ मला नको, पुजारी काका व मल्हारीस दे. अन् हो माझ्या खोलीत पलंगावर एक पिशवी आहे ती घेऊन ये.”
सरला , “जी.”
(तिने चहा दिला.)
लक्ष्मीबाई, “ वासवी ए वासवी.”
वासवी, “ काय मोठी आई.”
लक्ष्मीबाई, “ हे बघ, जेवण खोलीत जा. व एका वाटीतून दही साखर घेऊन ये. त्या मांजरिणीच्या तडाख्यातून राहिले असेल तर.”
इतक्यात मल्हारी सर्वांच्या पाया पडला. शिवण्णाच्या ही पाया पडला.
शिवण्णाने आशीर्वाद दिला.
शिवण्णा, “ आयुष्यमान भव.”
मल्हारी, “ चला बुवा.”
लक्ष्मीबाई, “ चला कुठं, थांब एक मिनिट.”
लक्ष्मीबाई, “ सरू ये सरू, सापडली नाही का पिशवी.”
सरू, “ हा सापडली, आले आले.”
लक्ष्मीबाई, “ वासवी ते वासवी.”
वासवी, “ आले, आले.”
वासवी दही साखर घेऊन जेवण खोलीतून जाताना.
सरस्वती, “ बघूया, कुठली अप्सरा आणतात ते.”
पार्वती, “ आमच्या पेक्षा डावीच मिळणार.”
वासवी, “ तुम्ही काही पण म्हणा, पण काकांचं लग्न झालं की तुमची काही धडगत नाही.”
पार्वती, “ कारटे, आजीची चोमडी कुठली?’
वासावी बाहेर आली. दही साखर पुजारी व मल्हारी काकांच्या हातावर दिले. ते प्राशन त्यांनी केले . इतक्यात सरू आली. तिने पिशवी दिली. पुजारी बुवांनी चहाचा कप सरुच्या हातात देवून मल्हारीच्या गाडीवर बसले. ते दोघे निघाले.
…… …,. ……..
क्रमशः पुढे ......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा