अस्तित्व पटकथा भाग ३० ,फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,
दिवसाचे दहा वाजून गेलेले ऑफिसमध्ये वरूण बॉस जवळ येतो.
बॉस, “वरूण काय झालं, सांगितलेल्या कामाचं?”
वरूण, “मी त्या जथ्थ्यात जाऊन माहिती काढली. तेव्हा मला असे आढळले, की हा जथ्था खूप लांबून कोकणातून आला आहे. व ते वाटेवर ज्या ठिकाणी थांबले. तेथेच हा दगड त्यांना प्राप्त झाला होता. व त्या दिवशी रागाच्या भरात त्या साधूने तो दगड मारला होता.”
बॉस, “आता आपल्याला ती जागा कशी सापडणार?”
तिथे असलेला जयेश
जयेश, “सोपं आहे. हे साधू ज्या ठिकाणाहून इथपर्यंत आले. त्या वाटेवर जिथे जिथे थांबले. तिथे जाऊन पाहणी केल्यास आपणास नक्की ते ठिकाण सापडेल.”
बॉस, “छान! बरं ही जबाबदारी तूच घे.”
जयेश, “चालेल बाबा.”
बॉस, “पण या कामासाठी तू वरूण सोबत गेलेले बरं. नाहीतर, तुझे ते बिनडोक मित्र घेऊन जाशील, आणि हा तुला सांगायचं राहिलं. की ते प्रकरण निवर्तले आहे. तुझ्या त्या मित्रांना आता ज्याच्या त्याच्या घरी तू पाठवावस. व वरूण आणि तू त्या जागेचा शोध घ्या, आणि हो त्या मित्रांपासून लांब राहा. काही उपयोगाचे नाहीत.”
जयेश आणि वरुण दोघेजण निघतात. ते मजल दरमजल करत वाटेत चौकशी करत निघतात. शेवटी ते सूर्यगावच्या आसपास येतात. जवळजवळ चार-पाच दिवस झाले ते शोधत होते. शेवटी ते सूर्यगावाजवळ पोहोचले तिथे गाडी रोडला एका चहाच्या टपरीवर थांबवली गेली. जयेश व वरूण दोघे चहा घेत असतात. त्याच वेळी त्यांना देवपूजेला निघालेली उमा दिसते.
जय, (मनात) “ काय सुंदर आहे? अगदी पहातच राहावं असं वाटतंय. अशी बाई मिळायला पाहिजे!”
तो तिच्याकडे पाहतच राहतो. ते वरूणच्या लक्षात येते. तो त्याच्या डोळ्यासमोरून हात फिरवतो.
वरूण, “आरे काय, कुठे गुंग आहेस?”
जयेशू, “काय नाही.”
वरूण, “आले माझ्या ध्यानात. पण हे गाव आहे. हे लक्षात ठेव ध्यानात.”
वरूण, “तसं नाही, आपण आलोय कोणत्या कामाला व करतोय काय? हे ध्यानात असू दे, म्हणजे झालं.”
जयेश, “हा, पण कोण असेल ती?”
वरूण, “असेल कोणतरी एखादी देवळात गेलेली. चला पुढे.”
ते गाडीत बसतात व निघतात. सूर्यगावापासून जाणाऱ्या हायवेने ते कोकणाकडे निघालेले असतात. अचानक त्यांच्या गाडीच्या चाकात काहीतरी टोकदार घुसल्याने पंक्चर झाली.
वरूणने गाडी साईटला घेतली.
जयेश, “ काय झालं?”
वरूण, “ गाडी पंक्चर झाली वाटतं.”
ते गाडीतून उतरतात. इकडे तिकडे बघतात. पण ते गावापासून दोन किलोमीटर असतात. कोणतीही मदत मिळणार नसते. ते गाडीच्या चाकाला लावण्यासाठी दगड शोधू लागतात. तेव्हा त्यांना आसपास शोधताना एक गुहा दिसते. तिच्याजवळ पडलेला दगड जयेश उचलण्यासाठी जातो. व तो दगड उचलून आणून गाडीच्या टायरला लावतो. ते गाडीचे टायर बदलू लागतात. त्यावेळी अचानक पाऊस येतो. त्यावेळी त्यांचे चाक बदलून पूर्ण झालेले होते. गाडी लॉक करून ते जवळील गुहेजवळ पळाले. अचानक आलेल्या वळवाच्या पावसामुळे पाऊस जोराचा आला होता. त्या गुहेत गेल्यावर त्यांना तिथे कुत्र्याची दोन पिल्ले एका दगडासोबत खेळताना दिसून आली तेव्हा जयेश पुढे आला त्यांनी त्या पिलांना उसकावले. ती गुरगरत बाहेर गेली त्याने तो दगड उचलला व पाहिला त्याला तो दगड मागे गाडीच्या काचेवर मारलेल्या दगडासारखा वाटला. त्याने तो आपल्या सोबत न्यायचे ठरवले थोड्यावेळाने ते पाऊस थांबल्यावर निघाले.
........ ............ .........
शहरातील उंच इमारतीतील कार्यालयात कंपनीचे बॉस हिरालाल आपल्या ऑफिस मधील कर्मचाऱ्यांशी बोलत होते. इतक्या टेबलावरील मोबाईलची रिंग वाजू लागली. त्यांनी तो फोन उचलला.
बॉस, “ हा जयेश, बोल.”
जयेश, “बाबा मला तो दगड सापडला.
बॉस, “ कुठे सापडला?”
जयेश, “आल्यावर सांगेन.”
बॉस, “आता कुठे आहात?”
जयेश, “आम्ही परत येतोय, थोड्या वेळात पोहोचू.”
बॉस, “ हे बघ तू, सरळ प्रभाकरनकडे संशोधन विभागात जा, मी येईन तिकडेच.”
जयेश, “हा.”
वरूण गाडी चालवतो.
............ ......... ......
जयेश व वरूण दोघे संशोधन विभागात जाऊन ती दगडे असणारी पिशवी संशोधकाकडे देतात. ते ती घेतात, त्यावर काहीतरी प्रयोग व चाचण्या केल्या जातात. थोड्यावेळाने बॉस तिथे येतात. जयेश व वरूण बाहेरील बाजूस बसलेले होते.
बॉस ऑफिस मध्ये आले.
बॉस, “जयेश व वरूण, हा काय झालं?”
वरूण, “आत मध्ये संशोधन करत आहेत.”
थोड्या वेळातच प्रभाकरन तिथे येतात. ते आपल्या हॉलमध्ये बसलेल्या ठिकाणी येतात.
बॉस, “काय झालं?”
प्रभाकरन टेबलावर ती दगडं ठेवत.
प्रभाकरन, “ही दगडे त्याच खनिजाची आहेत. जी आपणास मागील दगडामध्ये मिळालेली होती.”
बॉस , “जयेश, कुठे आहे हा दगडाचा साठा.”
जयेश, “इथून खूप दूर सह्याद्री पर्वतास लागून एक सूर्यगाव आहे त्या गावाशेजारील डोंगरात गुहेमध्ये हे दगड आम्हाला सापडले.”
प्रभाकरन, “या साठ्यावर तुम्हाला जर हक्क मिळाला. तर संपूर्ण कंपनी जी आता गाळात रुतलेली आहे. ती बाहेर पडेल व तुम्ही करोडपती नाही तर अरबपती व्हाल. पण सरकार व स्थानिक लोकांच्या परवानगीने हे काम होईल.
बॉस “हा साठा कोणत्याही पद्धतीने मी मिळवणारच. त्यासाठी वाटेल ते करायला लागू दे.”
त्यानंतर बॉस हिरालालने त्या प्रदेशातील आमदार स्थानिक खासदार व पुढारी लोकांना आपलेसे केले व जमिनी हस्तगत करण्यास सुरुवात केली सूर्यगाव शेजारील बाकीच्या गावात त्याने नोकरीच्या व पैशाचे आमीश देऊन त्या लोकांना आपला सातबारा नावावर करायला सुरुवात केली. पण या योजनेला विरोध केला. तो सूर्यगावातील लोकांनी..
......... .......... .......
क्रमशः पुढे ......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा