बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ३२

 अस्तित्व पटकथा भाग ३२

 

फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,


वकील शिवचरणने गावकऱ्यांची परवानगी घेऊन कागदपत्रे तयार करून त्याने जज करून स्टेची ऑर्डर मागवली, कागदपत्रे पाहतात आणि स्टेची ऑर्डर देतात व ती नोटीस पाठवली जाते

……..

कंपनी ऑफिसमध्ये मीटिंग चालू असते इतक्यात पोस्टमन खाली ऑफिसच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या टपाल पेटीमध्ये एक लिफाफा टाकून गेला. थोड्यावेळाने शिपाई टपाल पेटी खोलतो. ऑफिसमध्ये त्यातील पत्रे घेऊन येतो ऑफिसमध्ये बॉसच्या टेबलावर ती पत्रे ठेवली गेली. बॉसचे कोर्टाच्या त्या लेटरवर लक्ष गेले. त्याने ते खुले करून पाहिले. तर त्यामध्ये स्टेची असल्याचे आढळले. तेव्हा तो चिडला. त्याने कंपनीच्या ऑफिसमध्ये आलेली स्टेची ऑर्डर पाहून बॉस भडकला. त्याने लगेच फोन लावला. आपल्या कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांची मीटिंग सुरू झाली. कंपनीतील अतिउस्ताहाने मालकाने आपले पैसे गुंतवले होते. ज्या तीन गावांनी जमिनी दिल्या होत्या. त्या गावच्या हद्दीत फक्त 40% साठा खनिजाचा होता. उरलेला संपूर्ण सूर्यगावच्या हद्दीत व त्यातील 20% गावाच्या गायरानात, तर दहा टक्के मल्हारीच्या डोंगरातील शेतात. मल्हारी व त्याच्या दोन्ही भावांनी कंपनीच्या या दादागीरीला चांगलेच चॅलेंज दिले होते. मल्हारीने गावातील तरुणांना गोळा करून कधी वाटेत खिळ्यांचे ठोकळे टाकून तर कधी लोडच्या गाड्या पंक्चर करण्याचे काम चालवले होते. तर कधी मधाच्या पोळ्यांना गाडग्यात भरून आणून ती काम चालू असलेल्या परिसरात फोडून येथील कर्मचाऱ्यांना पळवून लावणे, असे उपयोग चालवले होते. तर कधी गावाच्या डोंगरातील मोठाले दगड तो डोंगरावरून खाली सोडत असे. यामुळे येणाऱ्या येणारे बरेच ट्रक त्या दगडामुळे मोडतोड होत. तर कधी वाटेत अडसर होत. जवळजवळ तीन महिने हे चाललेले होते. शेवटी चिडून जाऊन बसणे गावातील लोकांच्या जबरदस्ती सह्या घेण्यासाठी गुंड पाठवले. ते गाड्या घेऊन बाहेर पडले. त्या वेगाने गावाच्या दिशेने जाऊ लागल्या. त्या दिवशी सोमवार होता. उमा घरातील सर्व काम आटवून देवपूजेला शिवदर्शनास घरातील मुलासमवेत निघाली. सरु रानातून आलेल्या मिरच्या, शेंगा व धान्य वाळवत होती. प्रतापराव आतील वाड्यात हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. शिवाण्णा अंगणात नारळ सोलत होता. इतक्यात तिथे काही गाड्या आल्या. दारात थांबल्या. त्यावेळी मल्हारी गावातील मुलांबरोबर पुढील योजना बनवत होता. इतक्यात गाड्या दारात उभ्या झाल्या. त्यातून अनेक दांडगे मल्ला सन्मान शरीर असणारे गुंड बाहेर पडले. व त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रतिकार सुरू केला. शिवाण्णा देखील धावून गेला. गुंडाची थोडी झटापट झाली. इतक्या दारातील आवाज पाहून मल्हारी चालू भाऊ तेथे आला. त्यांच्याशी हातापायी करता, तोही जखमी झाला. गुंडातील एका स्त्रीने पार्वती व सरस्वतीला देखील खेचले. व जमिनीवर पाडले. ती मारु लागली. इतक्यात गोंधळ ऐकून मल्हारी व त्याचे मित्र तिथे आले. त्यांची व त्या गुंडांची जोरदार मारामारी चालू झाली. इकडे शिवपूजा मंदिरात करून उमाने प्रसाद दाखवून घेतला. व तिने मुलींना व मुलांना प्रसाद दिला. ती घराकडे मुलांना घेऊन निघाली. तिच्या पोटात बाळ होते. पुजारीबुवांच्या वाकून ती पाया पडली. पुजाऱ्याने तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. ती निघाली. गावात सर्वत्र सामसूम दिसत होती. ती जेव्हा वाड्याच्या अंगणाच्या गेट जवळ आली. तेव्हा तिने तिथे सर्वजण जखमी पडलेले पाहिले. तिच्यासोबत मुले घाबरली तिच्यासोबतची मुले घाबरलेली रडू लागली. वाड्याबाहेर सगळे अस्ताव्यस्त साहित्य पडलेले होते. अंगणातील वाळवण विस्कटलेले होते. अंगणाच्या एका कोपऱ्यात शिवाण्णा पडलेला तर दुसरीकडे सरला लोळत होती. बाजूला जोरदार भांडण चालू होते. यामध्ये गावातील बरेच जण तिथे पडलेले होते. तिने पाहिले त्या गुंडांच्या पायात तिचा नवरा मल्हारी पडलेला आहे. व ते किती किती हसत आहेत.

 त्यातील एक, “ पंगा घे पंगा आणखीन, तुला काय वाटलं सहज सोडतील. आता ही सर्व प्रॉपर्टीच नावावर करून घेताव. बघतच राहा.”

 मल्हारी, “सोडणार नाही, मी एकेकाला.”

 इतक्यात एक गुंड लोखंडी गजाने मारणार इतक्यात उमा किंचाळली. तिचा आवाज ऐकूण सर्वांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा मल्हारी, “ उमा पळ इथून, मुलांना व तुला वाचव.”

उमाने ओळखले, काय चालू आहे.

 त्यातील एक बॉसचा मुलगा, “अरे ही, हिला तर आपण मागे रोडला पाहिले होते, किती दिवस झाले शोधत होतो. आज सापडली. काटा किर, काय कडक माल आहे.”

 जयेश, “ हिला उचला व गाडीत घाला, आजची रात्र हिच्यासोबत .”

उमाने त्यांचा मनसुबा ओळखला. ती ओरडली, “लुका छुपी.”

 तिचे बोलणे ऐकताच मुले लांब पळाली. व त्यांनी आपल्याला पाहिजे त्या जागी लपली.

 येसाजी घाबरून. उमाच्या काळजीने तिथेच थांबला. तेव्हा उमेने त्याकडे नजर वळवली. व ती म्हणाली, “येसाजी आज्ञांचे पालन कर.”

 येसाजी, “पण ते गुंड तुला मारतील.”

 उमा, “माझी काळजी करू नकोस.”

  उमाने वर नजर रोखली. तिची नजर इकडे तिकडे फिरू लागली. सर्वत्र स्तब्ध झाले.

 ती हसली, जयेश तिच्याकडे कामुक नजरेने पाहत होता. उमा सुद्धा हसली. व तिने ओम शब्द उच्चारण्यास सुरुवात केली. तिच्या आवाजाने सर्व गुंड जागच्याजागी स्थिर झाले. तिने इशारा केला. ते गुंड आपापसातच लढू लागले. पाहता पाहता त्यांची जोरदार मारामारी सुरू झाली. ती जयेश जवळ आली. तिने त्याजवळ असणाऱ्या वरुणकडे पाहिले. तिचे डोळे तेजाने भरलेले होते. बघता बघता वरूण समोहित झाला. तिने आदेश दिला. “जा, हे सर्व कारस्थान करणाऱ्यास जाऊन संपव. हाच माझा आदेश.”

 तो समोहित युवक तिथून चालू लागला. जयेश पाहतच होता. त्याला काय चालले हे कळेनासे झाले. तो आश्चर्यचकित होऊन पाहतच होता. उमाने जवळ असणारी एक काठी उचलली व त्याला आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने ती चालवून बदडले व जखमी केले. तो तिथे विव्हळत पडला. उमा तुझ्या त्या घमेंडी बापाचे पिंडदान करण्यासाठी तुला जीवन सोडते आहे. आज हा मोडलेला पाय तुला जन्मभर लक्षात राहील, की तू केलेली घोडचूक, समजलं का? आज पर्यंत मी एक मर्यादा दाखवून होते. जेव्हा नारीच्या शोषिकतेचा अंत होतो. तेव्हाच तांडव सुरू होते.”

…………….

 गावातील हॉस्पिटलमध्ये अनेक जखमींना दाखल केले गेले. समोहिक गुंड कंपनीच्या एरियात गेले. तिथल्या अनेक या योजनेत सामील असलेल्या प्रत्येकास गाठून मारु लागले. शेवटी त्यातील एक गुंड हा ऑफिस मध्ये आला. त्यांनी बॉसवर बंदूक धरली व गोळी झाडली. पाठोपाठ त्याच्या मागे आलेल्या जयेशने देखील त्यावर गोळी झाडली. तो जाग्याला मरण पावला. तो वरूण होता.

         समाप्त

……. … …… …….


सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ३१

 अस्तित्व पटकथा भाग ३१



फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,



सूर्यगाव सकाळचे दहा वाजले. गावाबाहेरील मंदिराच्या प्रांगणात भव्यसभा आयोजित केलेली आहे. मल्हारी त्याचे भाऊ व गावकरी गावातील पंच सर्व बसलेले आहेत. उमा देखील आलेली आहे. तेथे बॉसचा मुलगा जयेश व वरूण आपल्या अनेक गुंडा समवेत आलेला आहे गावातील लोकांसमोर वरूण.

 वरूण, “ हे पहा आजूबाजूच्या गावातील लोकांनी या उत्खननास परवानगी दिली आहे. व तेथे कामाला सुरुवात देखील झाली आहे. गावातील लोकांना आलिशान फ्लॅट व 20-20 लाख प्रत्येकी दिले आहेत. या योजनेत सहभागी व्हा व आपल्या मुलांचं कल्याण करा. चार चाकी गाडीतून फिराल बघा.”

 एक गावकरी, “गाडीतून फिरवून व फ्लॅटमध्ये राहून पोटाला काय खावावं.”

 वरूण, “हे बघा, तुम्हाला काम देऊ. दररोज आम्हाला इथे मजुरांची आवश्यकता असतेच.”

 मल्हारी, “आम्ही सध्या इथे मालक आहोत व तू आम्हाला गुलामीचे स्वप्न दाखवतोस. गावकऱ्यांनो काही ऐकू नका याचं. आपली ही उपजावू जमीन एकदा का याच्या घशात गेली, की आपल संपलं. हे आता तुम्हाला काम देणार. नंतर खाणीतील धातू संपले की काय असेल भविष्य, वैराण, ओसाड माळ. जो पिके घेण्यास अनुपयुक्त असेल. आज येथील जमीन उपजावू आहे. जी दोन वेळची भाकर आपल्याला देते. खाणकाम करून त्यामधील जीवित्व काढून घेतल्यावर येथे काय येणार?”

 प्रतापराव, “आपल्याला माहित आहे, जिथे खाणकाम होते. त्या प्रदेशातील सर्व सृष्टी निर्जन ओसाड बनते. व एकदा का खाणीतील धातू संपला. की इकडे कोणाचेही लक्ष नसते. व आपली मुलेबाळे भीक मागत फिरतील का?”

 जयसिंगराव, “ते काही नाही आपलं भविष्य, आपल्या हाती. आम्हाला आमची जमीन द्यायची नाही.”

 सर्व गावकरी एकत्रित विरोध करतात. वरून व जयेश तेथून माघारी फिरतात. ऑफिसमध्ये बॉस बसलेला आहे. त्या शेजारी काही कर्मचारी, जयेश, वरूण, प्रभाकरन व काही गुंड आहेत.

 वरूण, “गावातून कडवा विरोध आहे. आम्ही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण गावातील लोकांनी काहीच ऐकले नाही.”

 बॉस, “गावची लोक साधी असतात. त्यांना गोड बोलून आपल्या बाजूला वळवायचं असतं. ज्याप्रमाणे दारूत बर्फ घोळवतो. तसं…”

 जयेश, “गावातील लोक साधीच आहेत. पण ते तिघे अतिशय हुशार वाटले, कडवा विरोध करणारे.”

 बॉस, “जे आपल्या विरुद्ध जातात. त्यांना अवचित बाजूला करता आलं पाहिजे.”

 वरूण, “इतकं सोपं नाहीये. साम, दाम दाखवून पाहिलय आम्ही.”

 बॉस, “तुम्ही पोरकट आहात. आता मी पहा कशी खेळी करतो ते?”

 बॉस बेल वाजवतो. शिपाई आत मध्ये येतो.

 शिपाई, “बोला साहेब,”

 बॉस, “हे बघ, सरोजा बाईंना बोलव.”

 शिपाई जातो. सरोजाबाईंना बोलवायला त्यांच्या केबिनमध्ये जातो. सरोजा बाई त्याच्या केबिनमध्ये ते दिसायला अत्यंत सुरेख व बुद्धीने अत्यंत बिलंदर बाई, तिला बोलावले जाते. ती आपल्या ताठ स्वभावात कॅटवॉक करत त्या रूम मध्ये दाखल होते. रूमचे दार उघडून.

सरोजा, “सर बोलावलंत.”

  बॉस, “हो एक काम होतं.”

सरोजा, “बोला कोणतं काम होतं.”

 बॉस, “होते एक महत्त्वाचं.”

 सरोजा, “बोला बॉस.”

 बॉस, “एका गावातील जमीन नावावर करून घ्यायचे आहे.”

 सरोजा, “एवढेच ना, मग झालं समजा.”

 बॉस, “वरूण सर्व काही माहिती मॅडमला द्या.”

 वरूण, “जी सर.”

 सकाळचे साडेदहा वाजले. सूर्यगावात एक कार व त्या पाठोपाठ चार ट्रक हजर होतात. गावात गाडी थांबल्यावर सुंदर तरुणी गाडीतून खाली उतरताना तिला पाहून गावकरी नादीष्ट वृत्तीने त्याजवळ जाऊन.

 एक गावकरी, “कोण बाई तु, कुणाकडे पाहुणी आलिय.” स्त्री, “मी सरकारी अधिकारी आहे, गावातील लोकांना शेतीची अवजारे व शेगडी वाटपासाठी आलेय व ज्याच्या नावावर सातबारा त्यालाच मिळेल सरकारी लाभ.”

 दुसरा गावकरी, “काय काय मिळेल बाई?”

संयोजा, “काय काय म्हणजे घरगुती व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू.”

 गावात एकच गोंधळ उडतो. जो तो येऊन आपलं नाव नोंदवून, अंगठा करून साहित्य घेऊन जाऊ लागतो. सुंदर मुलीच्या हातून वस्तू घेताना, जो तो कामातूर झालेला असतो. त्या दिवशी शेतात कामाला माणसे घेऊन मल्हारी गेलेला असतो. व त्याचे भाऊ काही धान्याच्या सौदा करण्यासाठी मंडीत गेलेले होते. त्यावेळी आपल्याला पण साहित्य मिळावे. या आशेने एक गावातील मुलगा गावातून मल्हारीच्या शेताला येतो. ज्या ठिकाणी त्याचे आई व बाबा शेतकामाला आलेले होते. शेतातील काम चालू होते.

एक स्त्री शेवंता, “ ऊन लई वाढायला लागलय ग. वाईच थोडा विसावा घेऊया की.”

 हरी, “एवढी पात लावू आणि बसू घटकाभर.”

 भांगलन करून थोडा वेळ पाणी प्यायला झाडाखाली विसावली होती. इतक्यात गावातून धावत हरीचा मुलगा शेतात आला. सुरज , “आई-बाबा” असे ओरडत शेतात आला. त्याला धावत येताना पाहून

 शेवंता, “ काय झालं, एवढा गडबडीने का आलायस?”

 सुरज, “आई, गावात सरकारी माणसं आल्यात व सगळ्यांना शेतीची अवजारे व शेगडी वाटप करत आहेत. ते बी फुकट.”

 आई, “ काय म्हणतोस?”

 मल्हारी, “फुकट की काय? कधी फुकट कोण देतो होय.” मुलगा, “होय, चालू आहे.”

 शेवंता व हरि आम्ही लगेच जाऊन येतो.

 मल्हारी, “ अन् कामाचं.”

 शेवंता, “लगेच येतो,”

हरी, “ चला रे.”

 तेव्हा सगळेच गावाकडे निघतात.

 मल्हारी, “फुकटच गावलं, अन् बापलेक धावलं, काय माहित काय सरकार करील आणि काय नाही.”

 सर्वजण साहित्य घेण्यासाठी एकच गर्दी करतात.

…… ….. ……


 पुढील प्रसंग

 सर्वजण ऑफिस मध्ये बसलेले होते इतक्यात तिथे सरोजा आली.

 बॉस , “सरोजा कामाचं काय झालं?”

 दुसरा कर्मचारी, “ सरोजा म्याडम अन् काम होणार नाही असं कधी घडलय का ?”

 सरोजा, “हीच तर माझी खासियत आहे.”

 सरोजा फाईल पुढे करते.

सरोजा, “ हा सर, ही घ्या फाईल. यामध्ये गावातील 60 टक्के लोकांची सहमती आहे.”

 बॉस, “ आणि बाकीचे.”

 सरोजा, “ते तुम्ही बघा, कारण त्या स्कीम मध्ये सापडलेले जेवढे शेती असणारे नग होते ना, त्यांचे आंगठे व सह्या मिळाल्या.”

बॉस, “यांने काम होईल.”

 दुसरा कर्मचारी, “का नाही, बहुमत तर मिळाले ना.”

बॉस , “ठीक आहे, पण केलंस कसं?”

 सरोजा, “ शांत राहून, थंड डोक्याने, शत्रूच्या कमजोरीचा फायदा घ्यायचा म्हणजे आपलं काम होतं.”

 बॉस, “ म्हणजे कायदेशीर वाट मोकळी झाली म्हणा.”

 सरोजा, “ कायदेशीर वाट झाली, पण वास्तविक प्रॅक्टिकली अवघड असणार.”

 बॉस, “त्यासाठी आपले गार्ड आहेत की.”

.......... ............ .......

काही दिवसांनी सूर्यगावात सकाळच्या वेळी काही मशिनरी दाखल झाल्या. त्या शेजारील रस्त्यावरून डोंगराकडे निघाल्या. त्या गावाचा डोंगर उकरुन त्याच्या गाभ्यात असणारे अनमोल खनिज काढण्यासाठी घेऊन जाण्यात आल्या होत्या. त्या मशनरीच्या घरघरण्याने गावची शांतता भंग पावत होती. थोड्याच वेळात गावातील मध्यभागी असणाऱ्या मंदिरातील घंटा घन घनू लागली. जो तो घरातील काम टाकून मंदिराकडे जात होता. गावातील पोरेसोरे आबाल वृद्ध जमा झाले होते. तेथे गेल्यावर गावकऱ्यांनी पाहिले. गावातील भिवा घंटा वाजवत होता. मल्हारी व त्याचे भाऊ देखील तेथे हजर झाले होते. मल्हारी, “भीवांन्ना का बेल वाजवतो आहेस? काय झाले व तुझ्या डोक्याला काय लागलया.”

 तशी गावात लोंकात कुजबुज चालू झाली.

भिवा पाटील, “आपण फसलो.”

 प्रतापराव, “नीट काय ते सांगशील का?”

 भिवा, “ साहेब सकाळी वैरणीला गावमिरीच्या रानात गेलतो. तर तिथे खाणकाम चालू होतं. मी त्यांना हटकले.”

दृश्य :

 भिवा, “काय रे, कोण तुम्ही माझ्या रानात काय चाललंय. व्हा बाहेर,”

तेव्हा ते

कर्मचारी, “ तुझं रान कुठलं? आता हे सरकारी मालकीचा आहे व सरकारने आमच्या ताब्यात दिलेय.”

 भिवा, “सरकारनी, आमच्या परवानगीशिवाय, सरकार कसं काही करू शकतं.”

 कर्मचारी, “परवानगी तर कधीच मिळाली.”

 भिवा, “ कोणी दिली.”

 कर्मचारी, “ तुझ्या गावकऱ्यांनी.”

 भिवा, “ नाही, तशी आम्ही कोणतीच परवानगी दिली नाही.”

 कर्मचारी, “ हा बघ हा कागद यावरील सह्या.”

 भिवा, “बघू…”

 भीवाने तो कागद हातात घेतला. व अत्यंत बारकाईने तो निरखला. त्यावर सूर्य गावाच्या लोकांचे उत्खननास परवानगी असल्याचे नमूद होते.

 भिवा, “ हा कागद खोटा आहे. आम्ही कुठलीच परवानगी दिली नाही.”

 कर्मचारी, “मग जा कोर्टात आणि घे जमीन.”

 भिवा, “ सोडतोय का? पहिल्यांदा माझ्या रानातून बाहेर व्हा.”

 कर्मचारी, “कुठलं रान,तुझं?”

तेव्हा त्यांच्याशी त्याची जोरात बाचाबाची झाली. व त्याला जोराचा चोर दिला.

…… ……………

 देवळाच्या दारात भिवा रडत होता. मल्हारी व गावाची पंचमंडळी त्याच्याजवळ गेली व त्याचे सांत्वन करून त्यास म्हणाले.

 मल्हारी, “भिवा, रडू नकोस. बघूया त्यांच्याकडे.”

 पंच, “बघूया, बघूया म्हणायला. ते गुंड लोक, त्यांचे हात वर पोहोचलेले. त्यांच्याशी कसं झुंजायचं.”

 दुसरी व्यक्ती, “ डोक्यात राग घालून नाही. शांततेने हा लढा लढायला हवा. आधी त्यांना परवानगी कशी मिळाली ते तर बघायला हवं.”

 मल्हारी, “पण आमच्या गावात येऊन आम्हावरच दांडगाई. आसमान दाखवू त्यांना.”

त्यांनाराव, “ असं रागात काय पण करून चालणार नाही. आपण वकिलाकडून नोटीस देऊ. व थांबवू हे काम.”

 मल्हारी, “ तुम्ही बघा वकिलाच, आम्ही आमचे पैतरे वापरतो.”

 जयसिंगराव, “ हे बघ मल्हारी विचारपूर्वक करायला हवं. सगळं.”

 मल्हारी व प्रतापराव गावातील वकील संदीप शिवचरण, वकील जे शहरात आहेत. त्यांची भेट घ्यायला गेले. शहरातील न्यायालयाबाहेर असणाऱ्या वकिलांच्या सज्जा मधील संदीप शिवचरण वकिलाकडे गावातील लोकांना घेऊन प्रतापराव गेले. ऑफिसमध्ये वकील शिवचरण बसून एका प्रॉपर्टीच्या केस बद्दल एका आशीलाशी चर्चा करत असतात. गावातील लोक आलेले पाहून शिवचरण, शिवचरण, “ प्रतापराव, आबा, काका तुम्ही सारे आज एकदम अचानक.”

 आबा, “ कामच तसं होतं.”

 शिवचरण, “ कोणतं काम?”

 आबा, “ एक कंपनी जबरदस्ती आमच्या परिसरात खोदकाम करत आहे. त्यांचा दांडगावा जोरात चालू आहे.”

 शिवचरण, “ हे तर, होणारच होते. मी मागं कल्पना दिली होती तुम्हाला, तेव्हा ऐकलं का नाही.”

 प्रतापराव, “ हे बघ ही अडाणी माणसं, यांना काय कळतंय? कायद्यातल. आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की आमची नैसर्गिक संपत्ती वाचवायची आहे. त्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे.”

 शिवचरण, “ ठीक आहे करेन मी मदत.”

 प्रतापराव, “ त्यासाठी लागेल तेवढा खर्च करू. पण हे उत्खननं थांबलं पाहिजे.”

 शिवचरण, “ लोकशाहीत लोकांच्या परवानगीशिवाय कोणतीच गोष्ट करता येत नाही. मी पाहीन.”

 सर्वजण, “ठीक आहे, मी पाहिन. बाहेर जरा थांबा आपण बोलू…”

ते बाहेर थांबतात.

…… ……….. ………

क्रमशः पुढे ........



शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ३०

 अस्तित्व पटकथा भाग ३० ,फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,


दिवसाचे दहा वाजून गेलेले ऑफिसमध्ये वरूण बॉस जवळ येतो.
 बॉस, “वरूण काय झालं, सांगितलेल्या कामाचं?”
 वरूण, “मी त्या जथ्थ्यात जाऊन माहिती काढली. तेव्हा मला असे आढळले, की हा जथ्था खूप लांबून कोकणातून आला आहे. व ते वाटेवर ज्या ठिकाणी थांबले. तेथेच हा दगड त्यांना प्राप्त झाला होता. व त्या दिवशी रागाच्या भरात त्या साधूने तो दगड मारला होता.”
 बॉस, “आता आपल्याला ती जागा कशी सापडणार?”
 तिथे असलेला जयेश
 जयेश, “सोपं आहे. हे साधू ज्या ठिकाणाहून इथपर्यंत आले. त्या वाटेवर जिथे जिथे थांबले. तिथे जाऊन पाहणी केल्यास आपणास नक्की ते ठिकाण सापडेल.”
 बॉस, “छान! बरं ही जबाबदारी तूच घे.”
 जयेश, “चालेल बाबा.”
 बॉस, “पण या कामासाठी तू वरूण सोबत गेलेले बरं. नाहीतर, तुझे ते बिनडोक मित्र घेऊन जाशील, आणि हा तुला सांगायचं राहिलं. की ते प्रकरण निवर्तले आहे. तुझ्या त्या मित्रांना आता ज्याच्या त्याच्या घरी तू पाठवावस. व वरूण आणि तू त्या जागेचा शोध घ्या, आणि हो त्या मित्रांपासून लांब राहा. काही उपयोगाचे नाहीत.”
  जयेश आणि वरुण दोघेजण निघतात. ते मजल दरमजल करत वाटेत चौकशी करत निघतात. शेवटी ते सूर्यगावच्या आसपास येतात. जवळजवळ चार-पाच दिवस झाले ते शोधत होते. शेवटी ते सूर्यगावाजवळ पोहोचले तिथे गाडी रोडला एका चहाच्या टपरीवर थांबवली गेली. जयेश व वरूण दोघे चहा घेत असतात. त्याच वेळी त्यांना देवपूजेला निघालेली उमा दिसते.
 जय, (मनात) “ काय सुंदर आहे? अगदी पहातच राहावं असं वाटतंय. अशी बाई मिळायला पाहिजे!”
 तो तिच्याकडे पाहतच राहतो. ते वरूणच्या लक्षात येते. तो त्याच्या डोळ्यासमोरून हात फिरवतो.
 वरूण, “आरे काय, कुठे गुंग आहेस?”
 जयेशू, “काय नाही.”
 वरूण, “आले माझ्या ध्यानात. पण हे गाव आहे. हे लक्षात ठेव ध्यानात.”
 वरूण, “तसं नाही, आपण आलोय कोणत्या कामाला व करतोय काय? हे ध्यानात असू दे, म्हणजे झालं.”
 जयेश, “हा, पण कोण असेल ती?”
 वरूण, “असेल कोणतरी एखादी देवळात गेलेली. चला पुढे.”
 ते गाडीत बसतात व निघतात. सूर्यगावापासून जाणाऱ्या हायवेने ते कोकणाकडे निघालेले असतात. अचानक त्यांच्या गाडीच्या चाकात काहीतरी टोकदार घुसल्याने पंक्चर झाली.
 वरूणने गाडी साईटला घेतली.
जयेश, “ काय झालं?”
 वरूण, “ गाडी पंक्चर झाली वाटतं.”
 ते गाडीतून उतरतात. इकडे तिकडे बघतात. पण ते गावापासून दोन किलोमीटर असतात. कोणतीही मदत मिळणार नसते. ते गाडीच्या चाकाला लावण्यासाठी दगड शोधू लागतात. तेव्हा त्यांना आसपास शोधताना एक गुहा दिसते. तिच्याजवळ पडलेला दगड जयेश उचलण्यासाठी जातो. व तो दगड उचलून आणून गाडीच्या टायरला लावतो. ते गाडीचे टायर बदलू लागतात. त्यावेळी अचानक पाऊस येतो. त्यावेळी त्यांचे चाक बदलून पूर्ण झालेले होते. गाडी लॉक करून ते जवळील गुहेजवळ पळाले. अचानक आलेल्या वळवाच्या पावसामुळे पाऊस जोराचा आला होता. त्या गुहेत गेल्यावर त्यांना तिथे कुत्र्याची दोन पिल्ले एका दगडासोबत खेळताना दिसून आली तेव्हा जयेश पुढे आला त्यांनी त्या पिलांना उसकावले. ती गुरगरत बाहेर गेली त्याने तो दगड उचलला व पाहिला त्याला तो दगड मागे गाडीच्या काचेवर मारलेल्या दगडासारखा वाटला. त्याने तो आपल्या सोबत न्यायचे ठरवले थोड्यावेळाने ते पाऊस थांबल्यावर निघाले.
........ ............ .........

शहरातील उंच इमारतीतील कार्यालयात कंपनीचे बॉस हिरालाल आपल्या ऑफिस मधील कर्मचाऱ्यांशी बोलत होते. इतक्या टेबलावरील मोबाईलची रिंग वाजू लागली. त्यांनी तो फोन उचलला.
 बॉस, “ हा जयेश, बोल.”
 जयेश, “बाबा मला तो दगड सापडला.
 बॉस, “ कुठे सापडला?”
 जयेश, “आल्यावर सांगेन.”
 बॉस, “आता कुठे आहात?”
 जयेश, “आम्ही परत येतोय, थोड्या वेळात पोहोचू.”
 बॉस, “ हे बघ तू, सरळ प्रभाकरनकडे संशोधन विभागात जा, मी येईन तिकडेच.”
 जयेश, “हा.”
वरूण गाडी चालवतो.
............ ......... ......

 जयेश व वरूण दोघे संशोधन विभागात जाऊन ती दगडे असणारी पिशवी संशोधकाकडे देतात. ते ती घेतात, त्यावर काहीतरी प्रयोग व चाचण्या केल्या जातात. थोड्यावेळाने बॉस तिथे येतात. जयेश व वरूण बाहेरील बाजूस बसलेले होते.
 बॉस ऑफिस मध्ये आले.
 बॉस, “जयेश व वरूण, हा काय झालं?”
 वरूण, “आत मध्ये संशोधन करत आहेत.”
 थोड्या वेळातच प्रभाकरन तिथे येतात. ते आपल्या हॉलमध्ये बसलेल्या ठिकाणी येतात.
 बॉस, “काय झालं?”
 प्रभाकरन टेबलावर ती दगडं ठेवत.
 प्रभाकरन, “ही दगडे त्याच खनिजाची आहेत. जी आपणास मागील दगडामध्ये मिळालेली होती.”
 बॉस , “जयेश, कुठे आहे हा दगडाचा साठा.”
 जयेश, “इथून खूप दूर सह्याद्री पर्वतास लागून एक सूर्यगाव आहे त्या गावाशेजारील डोंगरात गुहेमध्ये हे दगड आम्हाला सापडले.”
 प्रभाकरन, “या साठ्यावर तुम्हाला जर हक्क मिळाला. तर संपूर्ण कंपनी जी आता गाळात रुतलेली आहे. ती बाहेर पडेल व तुम्ही करोडपती नाही तर अरबपती व्हाल. पण सरकार व स्थानिक लोकांच्या परवानगीने हे काम होईल.
 बॉस “हा साठा कोणत्याही पद्धतीने मी मिळवणारच. त्यासाठी वाटेल ते करायला लागू दे.”
 त्यानंतर बॉस हिरालालने त्या प्रदेशातील आमदार स्थानिक खासदार व पुढारी लोकांना आपलेसे केले व जमिनी हस्तगत करण्यास सुरुवात केली सूर्यगाव शेजारील बाकीच्या गावात त्याने नोकरीच्या व पैशाचे आमीश देऊन त्या लोकांना आपला सातबारा नावावर करायला सुरुवात केली. पण या योजनेला विरोध केला. तो सूर्यगावातील लोकांनी..
......... .......... .......

क्रमशः पुढे ......